देवेंद्र फडणवीस सकाळी 8 वाजता पश्चिम महाराष्ट्रातील सर्व भाजपा आमदारांची बैठक वर्षा निवासस्थानी घेणार आहेत. गेल्या दोन दिवसांपासून फडणवीस विभागनिहाय बैठका घेत आहेत. स्थानिक पातळीवरील समस्या, पक्षांची बांधणी यांचा आढावा घेतला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वसई, विरार, मीरा भाईंदर मतदार संघातील विविध विषयाचा आढावा घेणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आधी या भागात भाजपा अधिक भक्कम करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत. आजच्या बैठकीत स्थानिक समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्री काही आदेश देतात याकडे लक्ष लागून राहिलं आहे.
Live Update : झारखंडमध्ये झालेल्या चकमकीत 1 सीआरपीएफचा जवान शहीद तर 2 नक्षली ठार
झारखंडच्या बोकारो जिल्ह्यात बुधवारी झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव पोलिस दलाचा (सीआरपीएफ) एक जवान आणि दोन माओवादी ठार झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
गोमिया पोलिस स्टेशन हद्दीतील बिर्होडेरा जंगलात पहाटे ५.३० वाजता माओवादी आणि सीआरपीएफमध्ये चकमक झाली.
बोकारो झोनचे आयजी क्रांती कुमार गाडीदेसी म्हणाले, "सुरक्षा दलांनी चकमकीत दोन माओवाद्यांना ठार केले. या चकमकीत सीआरपीएफच्या कोब्रा बटालियनचा एक जवानही शहीद झाला."
बोकारोचे एसपी हरविंदर सिंह म्हणाले की, चकमकीनंतर परिसरात शोध मोहीम सुरू आहे.
हिंगोली जिल्ह्यात मागील पंधरा दिवसापासून पावसाचे हुलकावणी, शेतकरी चिंतेत
राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असताना हिंगोली जिल्ह्यात मात्र मागील पंधरा दिवसापासून पावसाने हुलकावणी दिली आहे. पाऊस पडत नसल्याने खरीप हंगामातील प्रमुख पीक असलेले सोयाबीन सुकून आहे. पावसा अभावी सोयाबीन सुकून जात असल्याने शेतकरी सध्या स्पिंकलरच्या साह्याने पाणी देत असल्याच चित्र सध्या हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागात दिसून येत आहे.. तर हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी अजूनही एका दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
Live Update : नागपुरात युनियन बँकेविरोधात मनसेचं आंदोलन
नागपुरात युनियन बँकेविरोधात मनसेचं आंदोलन
कुटुंबीयांकडून मराठीतून तक्रार घेण्यास नकार दिल्याने मनसेने बँकेविरोधात आंदोलन पुकारलं..
Live Update : देवेंद्र फडणवीस यांचं परिणय फुके यांच्याकडून कौतुक
देवेंद्र फडणवीस यांचं परिणय फुके यांच्याकडून कौतुक
देवेंद्र फडणवीस म्हणजे प्रभू श्रीराम यांच्या सारखे चारित्र्यवान, श्रीकृष्ण सारखी चतुर्य बुद्धी, देवाधी देव महादेव यांच्यासारखे सहनशक्ती असणारे आणि त्यांच्या सारखे विष पचवणारे
सूर्या सारखे तेज असणारे चंद्रसारखे शीतल असणारे
असं कौतुक परिणय फुके यांनी भर परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी केलं
Live Update : पुण्यात कर्वेनगरमधील गोडाऊनला भीषण आग
पुण्यात कर्वेनगरमधील गोडाऊनला भीषण आग
सुदैवाने आगीत कुठलीही जीवित हानी नाही सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही
कर्वेनगर डी.पी. रोडवरील 'ए टू झेड कूल सेंटर' या गोडाऊनमध्ये आज आग लागल्याची घटना घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आणि जवानांनी तत्परतेने आगीवर नियंत्रण मिळवले
सदर गोडाऊनमध्ये जुने फ्रिज, एसी, वॉशिंग मशीन व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा साठा होता. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी मोठ्या नुकसानाची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Live Update : लांजामध्ये स्मशानभूमीत चोरी, शवदहन स्टॅन्डच्या 31 प्लेट्स लंपास
लांजात एका स्मशानभूमीतच चोरट्यांनी हात साफ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. नगर पंचायतीच्या हद्दीत असणाऱ्या स्मशानभूमीतील शवदहन स्टॅन्डच्या 31 प्लेट्स चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. याप्रकरणी लांजा पोलिसांत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रवींद्र विजय कांबळे यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार लिंगायत गुरव व अनंत राजका रेवाळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लांजा नगर पंचायतीच्या हद्दीत कनावजेवाडी येथे सार्वजनिक स्मशानभूमी आहे.
Live Update : कोल्हापूर खंडपीठबाबत मुंबईत आज बैठक
कोल्हापूर खंडपीठबाबत मुंबईत आज बैठक
कोल्हापूरला खंडपीठ स्थापन करण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याची चर्चा
आजच्या बैठकीमध्ये काय निर्णय येणार याकडे लक्ष
Live Update : विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं चड्डी बनियान आंदोलन, बनियान-टॉवेल लावुन पोहोचले पायऱ्यांवर...
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं चड्डी बनियान आंदोलन, बनियान-टॉवेल लावुन पोहोचले पायऱ्यांवर...
Live Update : माजी खासदार हेमंत गोडसे शिवसेना शिंदे गटाला रामराम ठोकणार ?
- माजी खासदार हेमंत गोडसे शिवसेना शिंदे गटाला रामराम ठोकणार ?
- हेमंत गोडसे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा
- गोडसे यांच्या सुनबाई आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवण्यासाठी आहेत ईच्छुक
- शिवसेनेकडून दोन वेळा लोकसभेची उमेदवारी मिळून देखिल गोडसे नाराज असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय
Live Update : ठाण्यात घोडबंदर रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी, दोन्ही मार्गांवर गाड्यांच्या रांगा लागल्या
ठाण्यात घोडबंदर रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी, दोन्ही मार्गांवर गाड्यांच्या रांगा लागल्या
गायमुख घाटाजवळ ठाण्याच्या दिशेने रस्त्यावर एक वाहन डिव्हायडरला धडकल्याने गायमुख परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाले आहे
ब्रह्मांड सिग्नल जवळ दोन अवजड वाहनांमध्ये अपघात झाल्याने वाहतूक कोंडी झाली
अवजड वाहनाचा ऑपरेटरला दुखापत झाली आहे
वाहतूक विभागाकडून रस्ता सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत...
Live Update :केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक, पावसाळी अधिवेशनापूर्वीची बैठक
केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक, पावसाळी अधिवेशनापूर्वीची बैठक
पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता होणार बैठक
अनेक महत्त्वाचे प्रस्ताव बैठकीत मंजूर होण्याची शक्यता
आगामी काळात होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता.
Live Update : भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर रविंद्र चव्हाण पहिल्यांदा पुणे दौऱ्यावर
भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर रविंद्र चव्हाण पहिल्यांदा पुणे दौऱ्यावर
आज पश्चिम महाराष्ट्र विभागाची घेणार बैठक
आगामी निवडणुकीच्या निमित्ताने घेणार बैठक
पश्चिम महाराष्ट्रातील सर्व प्रमुख नेत्यांची एकत्रित बैठक घेणार
प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर रविंद्र चव्हाण पहिल्यांदाच घेत आहेत पुण्यात बैठक
दुपारी १ वाजता भाजप कार्यालयात बैठक होणार
Live Update : रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची उसंत, दोन दिवस मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढलं
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची उसंत, दोन दिवस मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढलं
पावसामुळे काही ठिकाणी पुरजन्य परिस्थितीही निर्माण झाली होती
पण आज मात्र पावसाचा जोर ओसरल्याचं चित्र
सकाळपासून पावसाची विश्रांती
गेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 45 मिलिमीटर पवसाची नोंद
मंडणगड तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 88 मिलिमीटर पावसाची नोंद
काल इशारा पातळीवर धावणाऱ्या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये घट
तर खेड तालुक्यातील जगबुडी नदी अजूनही इशारा पातळीवर
खेडमधील जगबुडी नदी 5.30 मीटरवर
आज जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट
पहाटेपासून जिल्ह्यात पावसाची उघडीप
संगमेश्वर, मंडणगड, माखजन राजापूर मधील जनजीवन पूर्वपदावर
काजळी नदीकाठावरून या साऱ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी
Live Update : शरद पवारांनी भाकरी फिरवल्यानंतर लॉबिंग सुरू
राष्ट्रवादी शरद पवार पक्षात भाकरी फिरली असून ७ वर्षांनंतर पक्षाला नवा प्रदेशाध्यक्ष मिळाला आहे. जयंत पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर काल शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागल्यानंतर आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील अंतर्गत राजकारणाला रंग येणार आहे. जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष असताना फारशी ढवळाढवळ करता येत नसल्याने आमदार रोहित पवार आता प्रदेशाध्यक्ष बदलल्यानंतर विविध पदांवर आपली माणसांच्या नेमणुका करण्याच्या तयारीत आहेत. पक्षावर पकड मजबूत करण्यासाठी रोहित पवारांकडून आता लॉबिंग सुरु झाल्याची चर्चा आहे
Live Update : रिपब्लिकन सेना आणि शिंदेंच्या शिवसेनेची युती,एकत्रित पत्रकार परिषद घेऊन घोषणा करणार
रिपब्लिकन सेना आणि शिंदेंच्या शिवसेनेची युती, महापालिकेसाठी शिंदेंकडून दलित मतांची जुळवाजुळव, एकत्रित पत्रकार परिषद घेऊन युती जाहीर करणार आहेत.
आनंदराज आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे सख्खे लहान भाऊ आहेत
आज दुपारी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन घोषणा होणार
Live Update : लोणार तालुक्यात मुसळधार पाऊस ..
बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणार तालुक्यात काल सायंकाळी मुसळधार पाऊस झाला.. त्यामध्ये पांग्रा डोळे, टिटवी, नांद्रा , सह परिसरात पाऊस झाला.. यावेळी पांग्रा डोळे परिसरात ही मुसळधार पाऊस झाल्याने शेतातील वाहणारे पाणी थेट पांग्रा डोळे गावात शिरले.. दरम्यान काही घरात पाणी शिरल्याने घरांचं ही नुकसान झाले .. असेच शेतातील पाणी दरवर्षी गावात शिरते आणि गावातील घरांचे नुकसान होते.. त्यामुळे उपाययोजना म्हणून गावाबाहेरून नाली खोदण्यात यावी आणि शेतातील पाणी बाजूला असलेल्या नदीत सोडून द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी वेळोवेळी केली, मात्र त्यावर अद्यापही कारवाई झाली नाही .. परिणामी यावर्षी सुद्धा गावात पाणी शिरले आणि नुकसान झाले .. मात्र भविष्यात जर का काही मोठी दुर्घटना झाली तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होतोय ..