जाहिरात

Maharashtra Rain Update : आजही मुंबई-पुण्यात रिमझिम, 'या' दोन जिल्ह्यांना मात्र मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई आणि मुंबई उपनगरात आजच्या दिवसाची सुरुवात मुसळधार पावसाने झाली.

Maharashtra Rain Update : आजही मुंबई-पुण्यात रिमझिम, 'या' दोन जिल्ह्यांना मात्र मुसळधार पावसाचा इशारा

Mumbai-Pune Rain : यंदा गणपती विसर्जन रिमझिम पावसात पार पडलं. आजही मुंबई पुण्यास अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. आजही पालघर आणि नाशिक या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याशिवाय मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, रायगड, जालना आणि औरंगाबाद या जिल्ह्यांना यल्लो अलर्ट देण्यात आला आहे. 

मुंबई आणि मुंबई उपनगरात आजच्या दिवसाची सुरुवात मुसळधार पावसाने झाली. विशेषत: कल्याण, बदलापूर, अंबरनाथ या पट्ट्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.  

Nashik Crime : डुक्करांना त्रास म्हणून कुत्रे-मांजरींना विष देऊन संपवलं; संतापजनक कृत्य

नक्की वाचा - Nashik Crime : डुक्करांना त्रास म्हणून कुत्रे-मांजरींना विष देऊन संपवलं; संतापजनक कृत्य

अनंत चतुर्दशीलाही मुंबई आणि उपनगरात पावसाची रिमझिम सुरू होती. जोरदार वारा वाहत होता शिवाय हवेतही गारवा जाणवत होता. उद्या 8 सप्टेंबरला मात्र हवामान वगाकडून दिलेल्या माहितीनुसार, कुठेही पावसाची शक्यता नसेल. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com