जाहिरात

SSC Exam 2025 : कॉपी करणाऱ्यांवर दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा, दहावीच्या परीक्षेची नियमावली काय आहे?

Maharashtra Board SSC : ज्या विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा किंवा प्रात्येशिक परीक्षा चुकली असेल त्यांनाही दुसरी संधी देण्यात आली आहे.

SSC Exam 2025 : कॉपी करणाऱ्यांवर दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा, दहावीच्या परीक्षेची नियमावली काय आहे?

SSC Board Exam : बारावीनंतर आता दहावीच्या परीक्षेला उद्या 21 फेब्रुवारीपासून (Maharashtra Board SSC) परीक्षेला सुरुवात होणार आहे. यंदा राज्यातील 16 लाख विद्यार्थी परीक्षा देणार असल्याची माहिती आहे. या परीक्षेसाठी राज्यातील सरकारी, अनुदानित आणि खासगी व्यवस्थापनाच्या 23 हजारांहून अधिक शाळांनी जय्यत तयारी केली आहे. 

राज्यभरातून दहावीच्या परीक्षेला एकूण 16 लाख 11 हजार 610 विद्यार्थी बसणार आहेत. यामध्ये मुंबई विभागातून तीन लाख 60 हजार 317 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्या खालोखाल पुणे विभागातून दोन लाख 75 हजार 4 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. तर सर्वात कमी कोकण विभागातील 27 हजार विद्यार्थी संख्या आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने पत्रकार परिषद घेऊन परीक्षांबाबत सविस्तर सूचना दिल्या आहेत. महाराष्ट्र कॉपी मुक्त करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. त्यामुळे बारावीच्या परीक्षेत ज्या ठिकाणी कॉपीच्य घटना घडल्या अशा केंद्रांमधील कर्मचाऱ्यांना बदललं आहे की नाही याचीही तपासणी केली जाणार आहे. 

Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणींची नाव कापली तर मंत्रालयात घुसू, मंत्र्यांचं जीणं...' थेट इशारा कुणी दिला?

नक्की वाचा - Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणींची नाव कापली तर मंत्रालयात घुसू, मंत्र्यांचं जीणं...' थेट इशारा कुणी दिला?

यंदा दहावीच्या परीक्षेसाठी 16 लाख 11 हजार 610 विद्यार्थी परीक्षा देत आहे. यात 8 लाख 64 हजर 120 विद्यार्थी मुले आहे तर 7 लाख 47 हजार 471 मुली आहे. याशिवाय 19 ट्रान्सजेंडरही दहावीची परीक्षा देणार आहे. सद्यस्थितीत राज्यातील 5130 केंद्रांपैकी जवळपास 701 केंद्रावरील सगळाच परीक्षा स्टाफ बदलण्यात आला आहे. 

कॉपी करणारे आणि त्यात सहभागी असणारे विद्यार्थी त्यांच्यावर दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तर परीक्षा केंद्राच्या 500 मीटर परिसरामध्ये परीक्षा होईपर्यंत सगळी झेरॉक्सची दुकानं बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांना काही कारणास्तव तोंडी परीक्षा देता आली नाही त्यांना out of turn या परीक्षेमार्फत त्यांची चुकलेली तोंडी परीक्षा किंवा प्रात्येशिक परीक्षा ही 18 मार्च ते 20 मार्च या कालावधीत देता येणार आहे

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: