जाहिरात

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या "अनादि मी.. अनंत मी..." गीताला राज्य सरकारचा मानाचा पुरस्कार प्रदान

 स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लिखित "अनादि मी.. अनंत मी..." या गीताकरिता राज्य शासनाच्या "छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणागीत पुरस्कार - 2025" प्रदान करण्यात आला.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या "अनादि मी.. अनंत मी..." गीताला राज्य सरकारचा मानाचा पुरस्कार प्रदान
मुंबई:

छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने राज्य शासनाकडून प्रथमच राज्य प्रेरणागीत पुरस्काराची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली होता.  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण "वर्षा'' या शासकीय निवासस्थानी करण्यात आले.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

 स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लिखित "अनादि मी.. अनंत मी..." या गीताकरिता राज्य शासनाच्या "छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणागीत पुरस्कार - 2025" प्रदान करण्यात आला.  यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी 2 लाख रुपयांचा धनादेश स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपुर्द करण्यात आला.

( नक्की वाचा : Mumbai Metro : पावसाळ्यात मेट्रो रेल्वे सुरळीत राहण्यासाठी आराखडा तयार, वाचा काय करणार उपायययोजना? )

 याप्रसंगी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी सांगितले की, छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन हे जगण्याची आणि मरण्याची दोन्हीची प्रेरणा देते. त्यासोबतच, प्रचंड बुद्धिमत्तेने संभाजी महाराजांनी स्वतः साहित्य निर्मितीचे कार्यही फार उत्तम केले. त्यांनी ग्रंथही लिहिले, कविताही लिहिल्या. म्हणूनच, त्यांच्या नावाने राज्याचा पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला.

स्वाभाविकच स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे 'अनादि मी, अनंत मी..' प्रचंड आत्मबळ असलेले गीत त्यांनी लिहिले आणि रचले. त्यामुळेच राज्य शासनाने हा पुरस्कार दिला.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com