5 months ago
मुंबई:

Maharashtra Vidhan Sabha Live Update : काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांनी हिंदूंबाबत लोकसभेत केलेल्या वक्तव्याचे पडसाद विधानपरिषदेत (Vidhan Parishad) पाहायला मिळाले. विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि भाजप आमदार प्रसाद यांनी एकमेकांना शिवीगाळ केल्याची प्रकार विधानपरिषदेत घडला आहे. या घटनेनंतर आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर लाड आंदोलन करीत आहेत. ज्या पद्धतीनं विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी माझ्या आई बहिणीचा उच्चार केला हे चुकीचं आहे. विरोधी पक्षनेत्याला हे किती योग्य वाटतं याचा विचार करायला हवा. लोकप्रतिनिधीबद्दल जो शिव्या देतो याबद्दल मला उद्धव ठाकरेंना देखील विचारायचे आहे , असं ते यावेळी म्हणाले. 
 

Jul 02, 2024 14:06 (IST)

शिवीगाळ प्रकरणी अंबादास दानवेंवर कारवाई, पाच दिवसांसाठी निलंबित

काल १ जुलै रोजी प्रसाद लाड आणि अंबादास दानवे यांच्यामध्ये विधानसभेत झालेला वाद शिवीगाळ प्रकरणात दानवेंविरोधात कारवाई करण्यात आली आहे. त्यांना पाच दिवसांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. 

Jul 02, 2024 13:54 (IST)

ओबीसी नेते प्रकाश शेंडगे आणि शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

ओबीसी नेते प्रकाश शेंडगे आणि शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्री अतुल सावे यांची भेट घेणार आहेत. सर्व पक्षीय बैठक 29 जून रोजी ओबीसी प्रश्नांसंदर्भात बोलवण्यात आली होती, मात्र ती पुढे ढकलण्यात आली होती. दरम्यान, अद्यापपर्यंत सर्व पक्षीय बैठकीसंदर्भातली तारीख न ठरल्याने ओबीसींचे प्रश्न प्रलंबित आहेत. अशात, लवकरात लवकर बैठक घेत ओबीसींच्या संदर्भात प्रश्न सोडवण्याची ओबीसी नेत्यांनी मागणी केली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीतील घटपक्षांकडून  तारीख मिळत नसल्याने बैठक होत नसल्याची सूत्रांची माहिती आहे.

Jul 02, 2024 13:51 (IST)

पंकजा मुंडेंना विधानपरिषदेवर संधी : समर्थकांनी 5 हजार नारळ फोडत साजरा केला आनंद

Jul 02, 2024 13:47 (IST)

मुंबई पदवीधर विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार ॲड. अनिल परब यांचे आज मविआच्यावतीने सत्कार

मुंबई पदवीधर विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार ॲड. अनिल परब यांचे आज महाविकास आघाडीच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, नसीम खान, राष्ट्रवादीचे राजेश टोपे, अनिल देशमुख आणि इतर महाविकास आघाडीचे पदाधिकारी-आमदार उपस्थित होते.


Advertisement
Jul 02, 2024 13:31 (IST)

विधानसभेत शिवीगाळ प्रकरणात सुषमा अंधारेंचा गिरीश महाजनांवर पलटवार..

Jul 02, 2024 13:23 (IST)

लाडकी बहीण योजनेसाठी 50 रु मागणारा तलाठी निलंबित

लाडकी बहीण योजनेसाठी 50 रु मागणारा तलाठी निलंबित

लाडकी बहीण योजनेसाठी पन्नास रुपयाची मागणी करणारा सावंगी येथील तलाठी तुळशीराम कंठाळे यांना  निलंबित करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी तलाठी तुळशीराम कंठाळे यांची नोकरीवरून हकालपट्टी केली. लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रासाठी तुळशीराम कंठाळे महिलांकडून 50 रुपयांची मागणी करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

Advertisement
Jul 02, 2024 12:21 (IST)

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची मुदत वाढवण्याची मागणी!

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची मुदत वाढवण्याची मागणी!

राज्य सरकारने घोषणा केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची मुदत वाढ देण्यात यावी आणि योजनेसाठी असलेले रेशन कार्डची अट रद्द करावी अशी मागणी परभणी येथील जनहित मदत केंद्रातर्फे करण्यात आली आहे. या संदर्भामध्ये प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून याची अंमलबजावणी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. राज्य सरकारने नुकताच लाडकी बहीण या योजनेची घोषणा केली आहे.  त्याची अंमलबजावणी जिल्ह्यामधील सुरू झालेली आहे.

Jul 02, 2024 12:13 (IST)

कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषद कृषी विकास विभागातर्फे उत्कृष्ट शेतकऱ्यांना पुरस्कार प्रदान

कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषद कृषी विकास विभागातर्फे उत्कृष्ट शेतकऱ्यांना पुरस्कार प्रदान

माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त तथा कृषिदिन व डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीचे औचित्य साधत कृषी संजीवनी पंधरवडा कार्यक्रमाची सांगता होत आहे. याअनुषंगाने धुळे शहरातील पारोळा रोडवरील कृषी महाविद्यालयांच्या सभागृहात जिल्ह्यातील उत्कृष्टप्रगतशील, चार प्रयोगशील शेतकरीफळबाग, सेंद्रिय शेती, प्रक्रिया उद्योग, युवा शेतकरी, महिलाउत्कृष्ट अशा 20 शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान व वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

Advertisement
Jul 02, 2024 12:12 (IST)

कोल्हापुरात धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस, 9 बंधारे पाण्याखाली

कोल्हापुरात धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस, 9 बंधारे पाण्याखाली

दोन दिवसांपासून कोल्हापुरात पावसाची संततधार सुरू झाली आहे. धरण क्षेत्रात मुसळधार पावसाची बॅटिंग सुरू आहे. राधानगरी, गगनबावडा, शाहूवाडी, चंदगड, शिरोळ या तालुक्यांमध्ये पावसाने जोरदार आहे. धरणांच्या पाणी पातळीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. राधानगरी धरणातून 1100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी आज 19 फुटांवर आहे. तर जिल्ह्यातील नऊ बंधारे सध्या पाण्याखाली गेले आहेत.

Jul 02, 2024 11:28 (IST)

चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडेंना दिलं चाॅकलेट

चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडेंना दिलं चाॅकलेट

Jul 02, 2024 11:12 (IST)

विधानपरिषदेचं कामकाज सुरू होताच दोन मिनिटात स्थगित

विधानपरिषदेचं कामकाज सुरू होताच दोन मिनिटात स्थगित

गटनेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थित विरोधीपक्ष नेत्यांकडून झालेल्या शिविगाळाचा मुद्दा उपस्थित केला होता. कामकाज एका तासासाठी तहकूब करण्यात आलं आहे. 

Jul 02, 2024 11:10 (IST)

कालच्या भाषणानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Jul 02, 2024 10:51 (IST)

प्रसाद लाडसारख्या बेगडी, धंदेवाईक नेत्याने मला शिकवू नये - अंबादास दानवे

भाजपाने कायदे शिकवायची गरज नाही. ज्यांनी अनेक खासदारांना निलंबित केले त्या भाजपाने आम्हाला शिकवू नये. आज त्यांना कायदे आठवत आहे. कालपर्यंत ते कायद्याला आपली जहागिर समजत होते. मी कालही सांगितलं की, मी जे बोललो ते बोललो, मी मागे हटणार नाही. प्रसाद लाडसारख्या बेगडी, धंदेवाईक नेत्यांनी मला शिकवू नये. - अंबादास दानवे

Jul 02, 2024 10:25 (IST)

रत्नागिरी जिल्ह्यातील 21 धरणं 100 टक्के भरली!

रत्नागिरी जिल्ह्यात पडणाऱ्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील 68 धरणांपैकी 21 धरणं 100% भरली आहेत.  चिंचोली, सोंडघर, पंचनदी, मुचकुंदी, इंदवटी, कडवई, पानवळ अशी 21 धरण 100% भरली आहेत. तर 25 धरणं 50 टक्क्यांहून अधिक भरली आहेत. तर 16 धरणात 75 टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी जून महिन्यातील पावसाचं जिल्ह्यातील प्रमाण दुप्पट आहे. त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली. यापुढेही पाऊस असाच दमदार राहिल्यास उर्वरित धरणं देखील लवकर भरण्याची शक्यता आहे

Jul 02, 2024 10:20 (IST)

मविआकडून मिलिंद नार्वेकर आज अर्ज भरणार!

महाविकास आघाडीकडून मिलिंद नार्वेकर आज अर्ज भरणार आहेत. अर्ज भरतेवेळी उद्धव ठाकरे स्वतः उपस्थित राहणार आहेत. आज सकाळी 11 वाजता विधानभवनात अर्ज भरण्यात येणार आहे.