
Maharashtra Water Crisis: एकीकडे उन्हाचा पारा वाढत असताना दुसरीकडे राज्यात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. सोबतच धरणांमधील पाणीसाठा देखील झपाट्याने कमी होत आहे. राज्यातील मोठे, मध्यम व लघु अशा 2 हजार 997 सिंचन प्रकल्पात अवघा 33.37 टक्केच जलसाठा शिल्लक आहे. तापमानाचा पारा वाढत असून, एप्रिलपेक्षाही मे महिन्यात अधिक उष्णतेच्या झळा बसत आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
त्यामुळे प्रकल्पांतील पाणी पातळी आणखी खालावली जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे टँकरचा आकडा देखील वाढत आहे. राज्यातील 19 जिल्ह्यांतील 758 गावे व 2,257 गावांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. 57 शासकीय आणि 879 खासगी टॅकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. तर हा आकडा वाढण्याचा देखील शक्यता आहे.
नक्की वाचा - Melghat Jungle Safari : मेळघाट जंगल सफारीचा प्लान करताय? आधी ही बातमी वाचा!
राज्यातील टँकर्सची संख्या
ठाणे 47
रायगड 30
पालघर 28
नाशिक 90
अहिल्यानगर 8
पुणे 69
सातारा 66
सांगली 18
सोलापूर 19
छत्रपती संभाजीनगर 245
जालना 101
परभणी 1
धाराशिव 2
अमरावती 20
वाशिम 4
बुलढाणा 38
यवतमाळ 15
नागपूर 15
दरम्यान, नंदुरबार जिल्ह्यात वाढत्या उष्णतेबरोबर धरणातील पाणी साठ्यातील बाष्पीभवनाच्या प्रमाणातही वाढ झाली असून ग्रामीण भागासाठी संजीवनी असलेल्या लघु प्रकल्पांच्या पाणीसाठा मध्ये कमालीची घट झाली आहे. जिल्ह्यातील 13 लघु प्रकल्पांपैकी सहा लघु प्रकल्पांनी तळ गाठला असून लघु प्रकल्पांमध्ये 28.98% पाणीसाठा शिल्लक असून येणाऱ्या काळात ग्रामीण भागात तीव्र पाणी टंचाईची समस्या निर्माण होऊ शकते त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आहवान प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
Pune News: 'फिरायची हौस असेल तर...' अंबादास दानवेंचा अजित पवारांना टोला, कशावरुन संतापले?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world