जाहिरात

Unseasonal Rain: अवकाळीचा हाहाकार! नाशिक, पालघरला झोडपलं, हजारो शेतकऱ्यांना फटका

पावसामुळे औंढा नागनाथ तालुक्यातील हिवरा जाटू येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे विद्युत खांबे मोडून पडल्याने संपूर्ण परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.

Unseasonal Rain: अवकाळीचा हाहाकार! नाशिक, पालघरला झोडपलं, हजारो शेतकऱ्यांना फटका

नाशिक:  नाशिकच्या बागलाण तालुक्यातील आदिवासी पश्चिम परिसरात चार  दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे मोसम नदीला पूर आला.अवकाळी पावसामुळे शेतात काढून ठेवलेला कांदा, बाजरी, शेती पिकांचे नुकसान झाले तर  गोळवाड ते शेंदवड भवानी गाववादरम्यान नदीवरील मोठ्या पुलाचे काम सुरू होते. पुराच्या पाण्यामुळे पुलाच्या कामावरील सिमेंट व इतर साहित्य पुरात वाहून गेल्याने नुकसान झाले आहे.तसेच टँकर व ट्रॅक्टर देखील पाण्यात बुडाले.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

ताहाराबाद येथील परिसरातील अनेक वेगवेगळ्या प्रकारचे फळझाडे वनौषधी झाडे आंब्याचे व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.गोळवाड येथे बैल विजेच्या धक्क्यामुळे मयत झाला असून शेळ्या, लहान मोठे पाळीव जनावरे, शेतीचे साहित्य पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.प्रशासनाने तातडीने पंचनामे करावे अशी मागणी केली जात आहे.

दुसरीकडे, पालघर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीसोबत शेतीला पूरक व्यवसाय असलेल्या वीट उत्पादक शेतकऱ्यांचे देखील मोठ्या नुकसान झाले आहे. पालघर तालुक्यात 270 वीट उत्पादक असून जिल्ह्यात जवळपास दोन हजार पेक्षा जास्त वीट उत्पादक आहेत. या वीट भट्टी व्यवसायावर हजारो कामगारांचा देखील उदरनिर्वाह अवलंबून आहे. 

(नक्की वाचा - India Pakistan Tension: राहुल गांधींची पंतप्रधान मोदींकडे मोठी मागणी, मोदी निर्णय घेणार?)

मात्र अवकाळी पावसामुळे वीट उत्पादकांसह मजुरांचही मोठी आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे विट भट्टी व्यवसायाला आपत्कालीन मदतिच्या कक्षेत आणून विमा सुरक्षा दिल्यास नुकसान भरपाई भरपाई मिळण्यास मदत होईल अशी मागणी होत आहे. दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात काल रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे औंढा नागनाथ तालुक्यातील हिवरा जाटू येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे विद्युत खांबे मोडून पडल्याने संपूर्ण परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.

नक्की वाचा - Marathi Serial : 'सर्वात खादाड मालिका, कधीही पाहा नुसतं खात असतात'; मराठी मालिकेवर चाहते संतापले  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com