जाहिरात

मंत्रिपदासाठी महायुतीच्या आमदारांनी मुंबईत तळ ठोकला, जालन्यातून कोणाला मिळणार संधी?

मंत्रिपद मिळण्यासाठी महायुतीचे अनेक नेते मुंबईत दाखल झाले असून वरिष्ठांच्या भेटीगाठी घेत आहेत.

मंत्रिपदासाठी महायुतीच्या आमदारांनी मुंबईत तळ ठोकला, जालन्यातून कोणाला मिळणार संधी?
जालना:

लक्ष्मण सोलुंके, प्रतिनिधी

जालना जिल्ह्यातील पाच ही विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार निवडून आल्याने सत्ता स्थापनेनंतर आपल्यालाच मंत्रिपद मिळावं म्हणून भाजपा बरोबर शिवसेनेच्या आमदाराने मुंबई गाठत वरिष्ठांच्या भेटीगाठीला सुरुवात केली आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचे अर्जुन खोतकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. तर जिल्ह्यात सर्वाधिक मतांनी निवडून हॅट्रिक करणारे भाजपचे आमदार नारायण कुचे यांनी ही देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली आहे.

उद्यापर्यंत शपथविधी झाला नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागेल? कायदा काय सांगतो?

नक्की वाचा - उद्यापर्यंत शपथविधी झाला नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागेल? कायदा काय सांगतो?

भोकरदनमधून आमदारकीची हॅट्रिक करणारे संतोष दानवे आणि आमदार माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी ही वरिष्ठांची भेट घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता जालन्यातील नवनिर्वाचित आमदारांमध्ये मंत्रिपदासाठी फिल्डिंग लावल्या जात असल्याच्या चर्चाना उधाण आलं आहे. जालन्यातून बदनापूर विधानसभा मतदारसंघातून हॅट्रिक करत नारायण कुचे यांनी तिसऱ्यांदा सर्वाधिक 45 हजार 351 मतांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे त्यांना ही संधी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे तर भोकरदन मधून रावसाहेब दानवे यांचे सुपुत्र संतोष दानवे यांनी 23 हजार 167 मतांनी हॅट्रिक करत तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. त्यामुळे दानवे आपल्या मुलाला मंत्रिपद मिळावं म्हणून प्रयत्न करीत असल्याचं बोललं जात आहे.

Latest and Breaking News on NDTV

परतुर विधानसभा मतदारसंघातून मंत्री राहिलेल्या बबनराव लोणीकर यांचा अवघ्या 4 हजार 665 मतांनी विजय झाला आहे. तर जालन्यातून माजी मंत्री राहिलेल्या शिंदे गटाच्या अर्जुन खोतकर यांनी विद्यमान आमदार कैलास गोरंटयाल यांचा पराभव करत 31 हजार 651 मतांनी विजय मिळवला आहे. तर घनसावंगीमधून पाच वेळा आमदार राहिलेले माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा पराभव करणाऱ्या शिवसेनेच्या हिकमत उढाण यांनी ही एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

त्यामुळे जालन्यात कुणाच्या गळयात मंत्रिपदाची माळ पडते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं असून सर्वच नवनिर्वाचित आमदार वरिष्ठांच्या भेटीगाठी घेत असून भाजपात दानवे, कुचे, लोणीकर की शिवसेनेतून खोतकर की उढाण अशा चर्चांना जिल्ह्यात उधाण आलं आहे. सत्ता स्थापनेनंतर महायुतीचा फार्म्युला काय ठरतो, यावर जिल्ह्यात कुणाच्या गळयात मंत्रिपदाची माळ पडते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com