जाहिरात

Solapur Crime News : प्रेम संबंधाला विरोध, मुलानेच प्रेयसीच्या मदतीने घेतला आईचा जीव

भिमाबाई हनुमंत कळसगोंड असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर आरोपी मुलगा रमेश हनुमंत कळसगोंड आणि त्याची प्रेयसी गायत्री गुरप्पा जेवरगी अशी आरोपींची नावे आहे.  

Solapur Crime News : प्रेम संबंधाला विरोध, मुलानेच प्रेयसीच्या मदतीने घेतला आईचा जीव

सौरभ वाघमारे, सोलापूर

Solapur Crime News : प्रेम संबंधाला विरोध केल्याने मुलानेच प्रेयसीची मदत घेत आईचा खून केल्याची घटना समोर आली आहे. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील सिन्नुर गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

भिमाबाई हनुमंत कळसगोंड असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर आरोपी मुलगा रमेश हनुमंत कळसगोंड आणि त्याची प्रेयसी गायत्री गुरप्पा जेवरगी अशी आरोपींची नावे आहे.  मुलाने आपल्या प्रेयसीसोबत साडीच्या पदराने गळा आवळून खून केला. दोन्ही आरोपींना अक्कलकोट पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

(नक्की वाचा- "परतफेड करेन तेव्हा डिलिट करणार", नितशे राणेंना 'तो' व्हिडीओ आजही मोबाईलमध्ये सेव्ह करुन ठेवलाय)

अल्पवयीन मुलीचा आत्महत्या

दुसरीकडे, बारामती तालुक्यात 16 वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या विद्यार्थिनीने 8 एप्रिल 2025 रोजी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. तिला काही दिवसांपासून विशाल गावडे आणि त्याचे मित्र प्रविण गावडे, शुभम गावडे व सुनील खोमणे यांच्याकडून मानसिक त्रास दिला जात असल्याची माहिती तिच्या कुटुंबियांनी दिली आहे.

(नक्की वाचा- एस्केलेटरवरून पडून वृद्धाचा मृत्यू, पुणे रेल्वे स्थानकातील घटना)

मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, विशाल गावडे तिचा पाठलाग करत होता. तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होता आणि नकार दिल्यास संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत होता. या त्रासाला कंटाळून मुलीने आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे. बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: