
मेहबुब जमादार, रायगड
मांडवा ते मुंबई या मार्गावरील प्रवासी जलवाहतूक सोमवार 26 मे पासून बंद राहणार आहे. सध्या सुरू असलेल्या खराब वातावरणामुळे मेरिटाइम मंडळाकडून जलवाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु रो-रो सेवा (प्रवासी व वाहने) ची सेवा मात्र चालूच राहणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मांडवा-मुंबई जलमार्गाबरोबरच जंजिरा किल्ल्यात जाणारी जलवाहतूक सेवा देखील साधारण 30 सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, भाऊचा धक्का ते मांडवा रो-रो सेवा, करंजा ते रेवस, आगरदंडा ते दिघी ही प्रवासी जलवाहतूक सुरू राहील, असे मेरिटाइम मंडळाकडून कळवण्यात आले आहे.
दरवर्षी पावसाळा 7 जूननंतर सक्रिय होतो. मात्र यंदा लवकर पाऊस दाखल होणार आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे किनारी भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडू लागला आहे. त्यामुळे पीएनपी, अजंठा, मालदार या ऑपरेटर्सने वाहतूक दिलेल्या दिवसापासून बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
(नक्की वाचा- Rain Alert: मुंबईसह कोकणात आज मुसळधार पावसाचा अंदाज; या जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट)
दरवर्षी साधारण 12 लाख नागरिक जलमार्गाने प्रवास करतात, याशिवाय या मार्गावरून खासगी स्पीड बोटींचीही मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. हा मार्ग खोल समुद्रातून जात असल्याने पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे बोटी भरकटून अपघात होण्याची दाट शक्यता असते. त्याचबरोबर समुद्रात मोठ मोठ्या लाटा उसळत असल्याने त्यातून सावरणे बोटींना शक्य होत नाही.
(नक्की वाचा- Badlapur News: बदलापूरकरांना मोठा दिलासा! पुढील 30 वर्षांचा पाणीप्रश्न मिटणार)
त्यामुळे खबरदारी म्हणून दरवर्षी मेरिटाइम बोर्डाकडून गेटवे ते मांडवा या मार्गावरील वाहतूक बंद ठेवली जाते. तसेच रेवस-करंजा, आगरदंडा-दिघी या मार्गावरील खाडी अंतर्गत जलवाहतूक सुरू राहणार आहे. मुरूड-जंजिरा किल्ल्यातील जलवाहतूक बंद राहणार असल्याची माहिती राजपुरी बंदर निरीक्षक सतिष देशमुख यांनी सांगितले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world