
Manoj Jarange Patil Morcha : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची तलवार उपसली आहे. मनोज जरांगे आता थेट मुंबईच्या दिशेने कूच करत आहेत. यंदा आझाद मैदानात जाणार असल्याच्या भूमिकेवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. त्यामुळे राज्यभराचं लक्ष पुन्हा एकदा आझाद मैदानावर लागलं आहे.
मुंबईत आझाद मैदानात आंदोलनाला (Maratha reservation) बसून मराठा आरक्षणाच्या मागणीकडे मनोज जरांगे लक्ष वेधणार आहेत. त्याआधी आंतरवाली सराटी येथून मुंबईपर्यंत मराठा बांधवांसोबत ते हा प्रवास करत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालील या मोर्चाचा संपूर्ण मार्ग जाहीर करण्यात आला आहे, ज्यानुसार हा प्रवास 27 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी येथून सुरू झाला आहे.
नक्की वाचा - Manoj Jarange Patil Maratha Morcha LIVE : मनोज जरांगे पाटील जुन्नरमध्ये दाखल
आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठी महत्त्वाच्या अटी कोणत्या? l conditions for protesting at Azad Maidan
- एका वेळी फक्त एका दिवसाची परवानगी
- शनिवार, रविवार आणि शासकीय किंवा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कोणतीही परवानगी देण्यात येणार नाही.
- ठराविक वाहनांना परवानगी देण्यात आलेली असून वाहनतळासाठी वाहतूक पोलिसांशी विचारविनियम करुन परवानगी
- आंदोलनातील वाहने मुंबईत प्रवेश केल्यानंतर इस्टर्न फ्री वे या रस्त्याने वाडीबंदर जंक्शनपर्यंत येतील.
- पुढे मुख्य आंदोलकासोबत फक्त पाच वाहने आझाद मैदानात जातील.
- आंदोलकांची कमाल संख्या पाच हजारापर्यंत असावी
- आझाद मैदानांचे सात हजार स्क्वेअर मीटर एवढेच आंदोलनासाठी राखीव ठेवण्यात आले असून त्याची क्षमता पाच हजारापर्यंत असावी.
- ध्वनीक्षेपक, सार्वजनिक प्रचार यंत्रणा किंवा गोंगाट करणारी उपकरणे यांचा वापर करता येणार नाही.
- आंदोलनाची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेसाटी दिलेली असून त्यानंतर आंदोलकांना मैदानात थांबता येणार नाही.
- आंदोलनात सहभागी झालेली व्यक्ती त्या भागात कोणतेही अन्न शिजवणार नाहीत किंवा केर-कचरा करणार नाहीत.
- आझाद मैदानामध्ये सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान दिलेल्या अटी आणि शर्थींचे उल्लंघन केल्यास किंवा प्रचलित कायद्याचा भंग केल्यास आंदोलन बेकायदेशीर घोषित करून उचित कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world