जाहिरात

'संघर्षयोद्धा...', सिंगापुरात झळकले मनोज जरांगे पाटलांचे बॅनर

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांची लोकप्रियता आता सिंगापूरपर्यंत पोहोचली आहे. सिंगापूरमध्ये तरुणाने मनोज जरांगे पाटील यांचे बॅनर्स झळकावले आहेत. 

'संघर्षयोद्धा...', सिंगापुरात झळकले मनोज जरांगे पाटलांचे बॅनर

दिनेश कुलकर्णी, हिंगोली

मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाले आहे. राज्यात मनोज जरांगे पाटील जनजागृती शांतता रॅली सुरु केली आहे. या रॅलीच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील मराठावाड्यातील जिल्ह्यांमध्ये नागरिकांच्या भेटीला जात आहेत. मनोज जरांगे पाटील यांची लोकप्रियता आता सिंगापूरपर्यंत पोहोचली आहे. सिंगापूरमध्ये तरुणाने मनोज जरांगे पाटील यांचे बॅनर्स झळकावले आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

Manoj Jarange patil Banner in Singapore

Manoj Jarange patil Banner in Singapore

हिंगोलीच्या तरुणांनी मनोज जरांगे पाटील यांचे सिंगापूरमध्ये बॅनर झळकावले. 'संघर्षयोद्ध मनोज जरांगे पाटील', असं या बॅनरवर लिहिलं आहे. मनोज जरांगे पाटील यांचं काम देशाबाहेर पोहचवण्यासाठी वसमतच्या तरुणांनी निर्धार केला आहे.  या तरुणांची देखील हिंगोली जिल्हाभर चर्चा सुरु आहे. 

(नक्की वाचा - राष्ट्रवादी अजित पवार गटाला हिंगोलीत खिंडार, अनेक पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश)

हिंगोलीच्या हयातनगर आणि शेवाळा या गावातील युवकांनी मनोज जरांगे पाटील यांचे बॅनर थेट सिंगापूरमध्ये नेऊन झळकावले आहेत.हयातनगर गावातील ज्ञानेश्वर सोळंके आणि शेवाळा गावातील अविनाश पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांचे बॅनर नेऊन सिंगापूरच्या मार्रलिओन पार्कमध्ये झळकावले आहेत.  मनोज जरांगे पाटील यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. युवकांमध्ये प्रचंड प्रमाणात मनोज जरांगे पाटील यांची क्रेझ सध्या पाहायला मिळते आहे.

(नक्की वाचा-  ठाकरेंनी हुकमचा एक्का टाकला, आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य, शिंदे-फडणवीसांचे टेन्शन वाढणार?)

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं यासाठी सरकारला दिलेला कालावधी 13 जुलै रोजी संपणार आहे. याच पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात जनजागृती शांतता रॅली मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत निघाली आहे.  5 टप्प्यात ही रॅली काढण्यात येणार आहे. घराबाहेर पडल्याशिवाय मराठ्यांना न्याय मिळणार नाही. त्यामुळे मराठ्यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या रॅलीत मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com