
Maratha Reservation Morcha Mumbai Traffic Changes: मराठा आरक्षणाचा लढा दिवसेंदिवस तीव्र होत होताना दिसत आहे. गेल्या चार दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांनी ठिय्या मांडला आहे. लाखो मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल झाल्याने शहरात मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईमधील वाहतुकीत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे.
CSMT कडे जाणारे मार्ग बंद
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसबाहेर मराठा बांधवांची मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. मुंबईत सीएसएमटी आणि पालिकेच्या दिशेने येणारे सर्व मार्ग वाहतुकीसाठी आज ( 1 सप्टेंबर) बंद करण्यात आले आहेत. या वाहतुकीतील महत्त्वाच्या बदलामुळे आझाद मैदान, मरीन ड्राईव्ह, पायधुनी आणि वडाळा वाहतूक पोलिसांना वाढीव फोर्सही देण्यात आली आहे. वडाळा वाहतूक पोलिसांना 35 तर आझाद मैदान पोलिसांना 35 अशी 70 जणांची वाढीव कुमक देण्यात आली आहे. त्यासोबतच मुंबईमधील इतरी काही मार्गांवरील वाहतूक बदलण्यात आली आहे.
या मार्गांवरही वाहतूक बदल!
- मेट्रो जंक्शन ते CSMT च्या दिशेने येणारा आझाद मैदानच्या मुख्यद्वाराजवळील मुंबई महानगर पालिका मार्ग बंद.
- जे.जे उड्डाणपुल मार्गे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गाड्या मुंबई पोलीस आयुक्तालयामार्गे पुढे मेट्रो जंक्शन किंवा चर्चगेट स्थानक मार्गे वळवण्यात आल्या आहेत.
- हजारीमल सोमानी रोड जो फॅशनस्ट्रीटहून CSMT कडे येणारा आणि आझाद मैदानला लागून असलेला मार्गही बंद
- हुतात्मा चौकहून सीएसएमटीच्या दिशेने येणारा वाहतूक मार्गातही बदल
- मंत्रालयासमोरील मॅडम कामा रोड ते मरीनड्राईव्ह जंक्शन हे मार्गही सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवले जाणार आहेत.
- मराठा आंदोलकांच्या वाहकांमुळे बंद असलेला फ्री वे उद्या वाहतूकीसाठी खुला राहणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world