जाहिरात

Maratha Reservation: 'रोहित पवारांकडून दंगली घडवण्याचे कारस्थान...', मराठा क्रांती मोर्चाचा गंभीर आरोप

मराठा समाजाच्या आंदोलनामागून काही असूरी शक्ती दंगल घडवण्याचा प्रयत्न करत असल्याची जोरदार टीका मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक संदीप गिड्डे पाटील यांनी केली आहे.

Maratha Reservation: 'रोहित पवारांकडून दंगली घडवण्याचे कारस्थान...', मराठा क्रांती मोर्चाचा गंभीर आरोप

शरद सातपुते, सांगली: राज्यात मराठा आरक्षणाचा लढा दिवसेंदिवस तीव्र होत आहे. गेल्या चार दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण करत आगेत. अशातच मराठा क्रांती मोर्चाने मोठा दावा केला आहे.  आमदार रोहित पवार दंगली घडवण्याचे कारस्थान करत आहेत,यांचे काही मॅसेज समोर आले आहेत, असा धक्कादायक आरोप मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक संदीप गिड्डे पाटील यांनी केला आहे.

"शिंदे सरकारच्या काळात मराठा समाजाला काही प्रमाणात मागण्या मान्य झाल्या आहेत. मात्र पुन्हा मराठा समाज हा मुंबई येथे आंदोलनास बसले आहेत. त्याच वेळी तो विषय संपला होता. मात्र आता आरक्षण चा पोपट मेला आहे. रोहित पवार यांचे काही मॅसेज समोर आले आहेत. त्यामुळे या मराठा समाजाच्या आंदोलनामागून काही असूरी शक्ती दंगल घडवण्याचा प्रयत्न करत असल्याची जोरदार टीका मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक संदीप गिड्डे पाटील यांनी केली आहे.

Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live: मराठा आरक्षणावर तोडगा निघणार? मध्यरात्री वर्षावर महत्त्वाची बैठक

तसेच "शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली  एक समिती नेमण्यात यावी. त्यामध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात यांची नेमणूक करून त्या समितीचा  अहवाल घ्यावा. आणि तो अहवाल जो असेल तो राज्य सरकार ने मान्य करावा," असेही संदीप गिड्डे पाटील यावेळी म्हणाले आहेत. सांगलीमध्ये ते माध्यमांशी बोलत होते. 

भाजपचा मविआवर निशाणा! 

मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी गेल्या तीन दिवसापासून आंदोलन सुरू आहे. मात्र हे आंदोलन विरोधकांनी केलेल्या चुकीमुळे होत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिलं होतं मात्र उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस यांना टिकवता आलेला नसल्याची टीका भाजप सरचिटणीस विजय चौधरी यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला सर्वात प्रथम १६ टक्के आरक्षण फडणवीस यांनी देण्याचे काम केलं, मात्र हायकोर्टात टिकावं यासाठी फडणवीस नंतर उद्धव ठाकरे यांच्या सरकार आलं मात्र त्यांनी कोर्टात आरक्षण टिकाव यासाठी उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस यांनी कुठलेही प्रयत्न केले नाही त्यामुळे कोर्टात आरक्षण टिकलं नाही, खऱ्या अर्थाने मराठा समाजाला न्याय देण्याच्या काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. असंही विजय चौधरी म्हणाले.

Jalna News: 'उद्घाटनं करत काय फिरताय, मुंबईला जावा', मराठा आंदोलकांचा रावसाहेब दानवेंना दणका

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com