जाहिरात
2 days ago

मराठा आरक्षणासाठी मुंबईत केलेल्या आंदोलनात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने जरांगे आणि आंदोलनाच्या आयोजकांना फटकारले आहे. बुधवारी म्हणजेच काल ही सुनावणी पार पडली. झालेल्या नुकसान भरपाई कोण देणार? अशी विचारणाही न्यायालयाने या वेळी केली. याबाबत चार आठवड्यांत प्रतिज्ञापत्रात स्पष्टीकरण देण्याचे निर्देशही जरांगे आणि आंदोलनात सहभागी संघटनांना देण्यात आले आहे. त्यामुळे जरांगे यांच्या अडचणी वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

Live Update : कळवणच्या आश्रम शाळेतील 51 विद्यार्थ्यांना विषबाधा

नाशिकच्या कळवण आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत असलेल्या  कनाशी शासकीय आश्रम शाळेतील तब्बल ५१ विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आला आहे.  नाश्त्यासाठी दिलेल्या चिक्की व बिस्किटे खाल्ल्यानंतरच विद्यार्थिनींना अचानक सर्दी, खोकला, ताप, उलटी, मळमळ, पोटदुखी व जुलाब सारखा त्रास जाणवू लागल्याने एकच खळबळ उडाली. आश्रम शाळा प्रशासनाने विद्यार्थिनींना तातडीने कनाशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले. यातील पाच ते सहा विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर आहे.

Live Update: ठाणे महापालिका अनधिकृत इमारत कारवाई

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ठाणे महानगरपालिकेची तोडक कारवाई 

ठाण्यातील लोकमान्यनगर पाडा नंबर एक अनधिकृत चार मजली इमारतीवरती महानगरपालिकेचा हातोडा

इमारतीत कोणी रहिवासी राहत नव्हते 

चार मजली इमारत महापालिकेने जमीनदोस्त केली ,मात्र आजूबाजूच्या इमारतीला त्याचा परिणाम झाल्यामुळे स्थानिक आणि महानगरपालिका अधिकारी यांच्यात वाद....

इमारतीचा मलबा हटवण्याचा काम ठाणे महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे....

नंदुरबार जिल्ह्याला ऑरेंज अलर्टनंतर सकाळपासूनच पावसाची जोरदार हजेरी

नंदुरबार शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात

पुढील २४ तास पावसाच्या जोर कायम राहणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली...

या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूरस्थिती...

उद्याही नंदुरबार जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट...

प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सतर्क राहण्याचा आवाहन..

Live Update : वैभववाडी करुळ घाट 10 तास ठप्प

वैभववाडी करुळ घाट दहा तास ठप्प झाला आहे.  घाटामध्ये सकाळी आठ वाजता कोसळली दरड  कोसळली होती. 

दरड हटवण्याचे काम युद्ध पातळी सुरू आहे. पण मोठा दगडाचा दिघा रस्त्यावर असल्याने रात्री उशिरापर्यंत काम सुरू राहील.  तीन ते चार जेसीबी ही दरड हटवण्याचे काम करत आहेत.  रात्री उशिरापर्यंत एक दिशा मार्ग सुरू होण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरला जोडणारा हा घाट आहे. 

Live Update : पुण्यात ओबीसी समाजाचं महाघंटानाद आंदोलन

पुण्यात ओबीसी समाजाचं महाघंटानाद आंदोलन 

राज्य सरकारच्या GR विरोधात ओबीसी समाज आक्रमक 

आम्ही ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी म्हणत पुण्यातील जिल्हाअधिकारी कार्यालयाबाहेर  ओबीसी समाजाकडून करण्यात आलं महाघंटानाद आंदोलन 

राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत  ओबीसी समाजाकडून GR चा निषेध

Live Update : बाणगंगा नदीमध्ये कोणत्याही मूर्ती विसर्जनास परवानगी नाहीच, महाराष्ट्र प्रदूषण मंडळाची नियमावली कोर्टाने ठरवली योग्य

बाणगंगा नदीमध्ये कोणत्याही मूर्ती विसर्जनास परवानगी नाहीच

- महाराष्ट्र प्रदूषण मंडळाची नियमावली कोर्टाने ठरवली योग्य

- कृत्रिम तलावात शक्यतो शाडू मातीच्या मूर्ती विसर्जित करू नये असे नियमावलीत आहे

Live Update : जळगाव जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाची दमदार हजेरी

जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून दमदार पावसाने हजेरी लावली असून जिल्ह्यात बुधवारी रात्री व गुरुवारी पहाटे अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. जळगाव शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाची संततधार सुरू असून हवामान विभागाच्या वतीने आज व उद्या जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे आज दिवसभरात पुन्हा अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हा वर्तवण्यात येत आहे..

Live Update : पंढरपुरात सोलापूर जिल्ह्यातील ओबीसी समाजाची बैठक

मराठा आरक्षणाबाबत मुंबई येथे काही निर्णय झाले. यानंतर आज पंढरपूरला तत्काळ सोलापूर जिल्ह्यातील ओबीसी बांधवांची बैठक झाली. या बैठकीमध्ये मराठा आरक्षणाबाबत सरकारने दिलेले शासन आदेश फाडून टाकण्यात आला. भाजपा सरकार ओबीसीवर अन्याय करत आहे.  ओबीसींच्या पाठीत सरकारने खंजीर खूपसल्याची भावना आहे. त्यामुळे फडणवीस यांनी तात्काळ मराठा समाजाबद्दल चा शासन आदेश रद्द करावे. अन्यथा भाजप आणि महायुतीला महागात पडेल. असा थेट इशारा ओबीसी समाजाच्या बैठकीतून देण्यात आला. 

Live Update : स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतरही सरांडा गाव रस्त्याविना, गावकरी त्रस्त

गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील मुरगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणारे सरांडा (बुज) हे गाव आजही रस्त्याविना अंधारात आहे. स्वातंत्र्याला 78 वर्ष पूर्ण झाली, पण गावाला जोडणारा पक्का रस्ता आजवर झाला नाही, यावरून नाराज ग्रामस्थांनी ग्रामपंचायत व जिल्हा प्रशासनावर गंभीर आरोप करत संताप व्यक्त केला आहे. 

मागील चार वर्षांपासून दरवर्षी पावसाळा सुरु होताच ग्रामस्थ स्वतः पैसे गोळा करून तात्पुरता रस्ता बनवतात. विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर, आरोग्यावर, तसेच अवगमनासाठी रस्त्याअभावी परिणाम होत आहे. याकडे संबंधित विभागाने तातडीने लक्ष घालावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे

Live Update : मूलबाळ होत नाही म्हणून विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ, 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यातील एका विवाहितेचा सासरकडून तुला मूलबाळ होत नाही असे म्हणून शारीरिक व मानसिक छळ करण्यात आल्याची घटना घडली आहे. सोनु तायडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार,पती सुनील तायडे यांच्यासह नऊ जणांनी विवाहितेवर छळ  केला असून तसेच घर बांधण्यासाठी माहेरवरून एक लाख रुपये आणण्याचा तगादा देखील सासरच्या मंडळींकडून लावण्यात आला होता.ही मागणी पूर्ण न झाल्याने छळ कायम ठेवण्यात आला. पीडितेच्या तक्रारीवरून मंगरूळपीर पोलिसांनी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

Live Update : नशेखोराने दारूसाठी पत्नीला जिवंत पेटवलं

छत्रपती संभाजीनगरात नशेखोर पतीच्या क्रूर कृत्याची शहरात सलग तिसरी घटना आहे. आंबेडकरनगरमध्ये नशेसाठी पैसे देत नसल्याच्या कारणावरून पतीने झोपेतून उठत पत्नीवर सुलोचनची कॅन रिकामी करत पेटवून दिले. मंगळवारी सायंकाळी आंबेडकरनगरमध्ये घडलेल्या घटनेत विवाहिता गंभीररीत्या भाजली असून तिच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी पत्नीच्या जबाबावरून आरोपी पती सरवर शहा मुसा शहा याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सिडको पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Live Update : वैभव खेडेकर यांचा आज भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून बडतर्फ केलेले मनसेचे कोकण विभागीय संघटन संघटक तसेच राज्य सरचिटणीस व खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर हे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत मनसेमध्ये बडतर्फ करण्यात आलेले पदाधिकारी यांचाही पक्षप्रवेश होणार आहे. याची जय्यत तयारी खेडेकर समर्थकांकडून करण्यात आली आहे.  प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश मुंबईत होणार आहे. जनतेमधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निवडून येणारे वैभव खेडेकर हे पहिले नगराध्यक्ष होते. मनसेच्या स्थापनेपासून सलग पंधरा वर्षे नगरपालिकेत त्यांची सत्ता होती. खेडेकर यांच्या प्रवेशामुळे रत्नागिरी जिल्ह्यात भाजपची ताकद आणखी वाढणार आहे..

Live Update : जलवाहिनीसाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून तीन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर शहरासाठी सुरू असलेल्या नव्या पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी टाकण्यासाठी देवळाई परिसरातील म्हाडा कॉलनी परिसरात १० फूट रुंद आणि १५ फुटांचे मोठे खड्डे खोदण्यात आले आहेत. याच खोल खड्ड्यात पडून ३ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ईश्वर संदीप भास्कर असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. चिकलठाणा पोलिस ठाण्यात घटनेची आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Live Update : जलवाहिनीसाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून तीन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर शहरासाठी सुरू असलेल्या नव्या पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी टाकण्यासाठी देवळाई परिसरातील म्हाडा कॉलनी परिसरात १० फूट रुंद आणि १५ फुटांचे मोठे खड्डे खोदण्यात आले आहेत. याच खोल खड्ड्यात पडून ३ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ईश्वर संदीप भास्कर असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. चिकलठाणा पोलिस ठाण्यात घटनेची आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Live Update : जलवाहिनीसाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून तीन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर शहरासाठी सुरू असलेल्या नव्या पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी टाकण्यासाठी देवळाई परिसरातील म्हाडा कॉलनी परिसरात १० फूट रुंद आणि १५ फुटांचे मोठे खड्डे खोदण्यात आले आहेत. याच खोल खड्ड्यात पडून ३ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ईश्वर संदीप भास्कर असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. चिकलठाणा पोलिस ठाण्यात घटनेची आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Live Update : उजनी धरणातून भीमा नदी पात्रात 20 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू

 उजनी धरणातून भीमा नदी पात्रात मध्यरात्री दोन वाजल्यापासून 20 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. पूर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी हा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. उजनी धरणाच्या 16 दरवाजांमधून हा पाण्याचा विसर्ग केला जातोय. या पार्श्वभूमीवर उजनी धरण व्यवस्थापनानं भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

सध्या उजनी धरून 106 टाक्याहून अधिक भरलं आहे. उजनी धरणात एकूण पाणी साठवण क्षमतेच्या 120 पूर्णांक 71 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. उजनी धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता 123 टीएमसी असून सध्या दौंड बंधाऱ्यातून उजनी धरणात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह 11196 क्युसेक इतकं असून उजनी धरून काटोकाठ भरलं असल्याने उजनी धरून व्यवस्थापनाने भीमा नदी पात्रात मध्यरात्री दोन वाजल्यापासून 20 कुसेकने पाण्याचा विसर्ग सुरू केलाय. यात कमी अधिक वाढ केली जाऊ शकते.

Live Update : अनंत चतुर्दशीला मोठा घातपात घडवण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीवर कारवाई

येत्या शनिवारी अनंत चतुर्दशीला मोठा घातपात घडवण्याच्या तयारीत असलेल्या आरोपींवर छत्रपती संभाजीनगर एटीएसच्या सूचनेवरून मध्य प्रदेशच्या खंडवा पोलिसांनी कारवाई केली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात 2012 साली हिमायतबाग परिसरात एटीएसवर गोळीबार केल्याच्या प्रकरणातील आरोपी खलील अखिल खिलजी याचा भाऊ जलील अखिल खिलजीला मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातून अटक केली करण्यात आली आहे. या कारवाईत आरोपीकडून गावठी कट्टा, ७ जीवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे. तर जलीलचा वडील मोहम्मद अकील खिलजी हा देखील सिमीचा जिल्हा प्रमुख होता. त्याला काही वर्षांपूर्वी भोपाळ पोलिसांनी चकमकीत ठार केले होते. जलीलचा प्लॅन हिंदू संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना टार्गेट करण्याचा होता अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com