जाहिरात

Jalna News: 'उद्घाटनं करत काय फिरताय, मुंबईला जावा', मराठा आंदोलकांचा रावसाहेब दानवेंना दणका

रावसाहेब दानवे हे शिरजगाव वाघाळ गावात उद्घाटनासाठी आले होते.

Jalna News: 'उद्घाटनं करत काय फिरताय, मुंबईला जावा', मराठा आंदोलकांचा रावसाहेब दानवेंना दणका
जालना:

मराठा आंदोलकांनी माजी मंत्री रावसाहेब दानवे यांचा कार्यक्रम उधळून लावल्याची घटना जालन्यात घडली आहे. दानवे यांच्या कार्यक्रमात मराठा आरक्षणाची घोषणाबाजी करण्यात आली. रावसाहेब दानवे यांच्या गावा शेजारीच हा उदघाटन सोहळ्या आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी सुरू कार्यक्रम मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी बंद पाडला. शिवाय जी आश्वासनं खासदार असताना दिली होती ती आता पूर्ण करा. तुमचा मुलगा ही आता आमदार आहे त्यामुळे कामं करून द्या असं ही गावकऱ्यांनी दानवे यांना यावेळी ठणकावून सांगितलं. 

रावसाहेब दानवे हे शिरजगाव वाघाळ गावात उद्घाटनासाठी आले होते. त्यांच्या हस्ते गावात विविध विकास कार्यक्रमांचे उदघाटन होणार होते. त्यावेळी तिथे गावातील मराठा आंदोलक तिथे आले. गावातील तरुण आरक्षणासाठी मुंबईत उपोषण करत आहेत, आणि तुम्ही इकडं उद्घाटन करत फिरताय, कशाचं उदघाटन करताय असा जाब गावातल्या लोकांनी विचारला.  उद्घाटन करत फिरण्या पेक्षा मुंबईत जा. आरक्षण मिळवून देण्यास मदत करा.  असं गावातले मराठी तरूण यावेळी बोलताना दिसत होते. यावेळीच जोरदार घोषणाबाजी झाल्याचे ही दिसून आले.

नक्की वाचा - मोठा पेच! मराठा समाजाला ‘सरसकट कुणबी' संबोधण्यास हायकोर्ट- सुप्रीम कोर्टाचा सपशेल नकार

हे सर्व होत असताना रावसाहेब दानवे यांना पाहात राहण्या शिवाय पर्याय राहील नव्हता. गावातली एक महिला ही पुढे आली. तिने तर रस्त्याची उद्घाटनं काय करता, गावातल्या रस्ता तीन वर्षापूर्वी करणार असं तुम्हीच सांगितलं होतं. तो अजूनही झाला नाही आणि नवं उद्घाटन कशासाठी करता असा सवाल केला. पण आता खासदार तुम्ही नाहीत. पण तुमचा मुलगा आमदार आहे. तर ते न झालेलं काम तुम्हीच करू द्या असं ही तिने भर कार्यक्रमात दानवे यांना सांगितलं. ती महिला बोलत असताना गावातल्या लोकांनी जोरजोराश शिट्या आणि टाळ्या वाजवल्या.  

Manoj Jarange Patil Maratha Morcha : मराठा आंदोलनादरम्यान हळहळ! आणखी एका मराठा बांधवाचा मृत्यू

त्यानंतर हा कार्यक्रम उधळवण्यात आला. पण काही वेळात पुन्हा कार्यकर्त्यांना जमवून उद्घाटनाचं सोपास्कार दानवे यांनी पार पाडलं. पण त्यांना मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना मात्र करावा लागला. त्याची चर्चा मतदार संघात चांगली रंगली आहे. मराठा आंदोलनामुळेच रावसाहेब दानवे यांना लोकसभेला पराभव स्विकारावा लागला होता. त्यानंतर ते सतत मतदार संघात फिरत असतात. पण त्यांच्यावरचा मराठा आंदोलकांचा रोष अजूनही कमी झालेला नाही. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com