जाहिरात

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार! आजपासून उपोषणाला बसणार; आरक्षणावरुन सरकारला घेरणार

मनोज जरांगे पाटील आजपासून उपोषणाला बसणार आहेत. जालन्यामधील अंतरवाली सराटी या त्यांच्या गावी जरांगे पाटील हे उपोषणाला बसणार असून त्यांच्या उपोषणाची जोरदार तयारी करण्यात आली आहे.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार! आजपासून उपोषणाला बसणार; आरक्षणावरुन सरकारला घेरणार

लक्ष्मण सोळुंके, जालना: मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण अस्त्र उगारले आहे. मराठा बांधवांना ओबीसीमधून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगेंनी आजपासून उपोषणाला बसणार आहेत. जालन्यामधील अंतरवाली सराटी या त्यांच्या गावी जरांगे पाटील हे उपोषणाला बसणार असून त्यांच्या उपोषणाची जोरदार तयारी करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मनोज जरांगे पाटील आज सातव्यांदा अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला सुरवात करणार आहेत आहेत.आज दहा वाजता मनोज जरांगे आमरण उपोषणाला सुरवात करणार आहेत. उपोषणाला बसण्याआधी अंतरवाली गावात उपोषणाची तयारी करण्यात आली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावे. सगे सोयरे अध्यादेशाचं कायद्यात रुपांतर करून अंमलबजावणी करावी.  हैदराबाद, सातारा , बॉम्बे गॅझेट लागू करण्याची मागणी त्याच बरोबर सरपंच संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणारील दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. फडणवीस यांना ही शेवटची संधी आहे त्यामुळे त्यांनी मराठा समाजाच्या मागण्या पुर्ण कराव्या असा इशाराही जरांगे यांनी दिला आहे. 

'मी समाजासाठी लढत आहे ,स्वतःसाठी नाही. चंद्र,सूर्य असेपर्यंत मी लढतच राहणा आहे. समाजाला कधीही सोडू शकत नाही. मुख्यमंत्री फडणवीस आम्हाला आरक्षण देणार आहेत. फडणवीस यांना मराठे मोठे व्हावे वाटतात की नाही ते आता उघड होणार, असे म्हणत मराठ्यांशी बेईमानी करणं त्यांना महाग पडणार आहे, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे. 

( नक्की वाचा :  Mamta Kulkarni : ममता कुलकर्णी बनली किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर, महाकुंभात केले पिंडदान, Video )

मराठ्यांनी भरभरून सरकारला मते दिली आहेत,मुख्यमंत्री आमच्याशी दगाफटका करणार नाहीत,उद्या 10 ते 11 वाजता उपोषण सुरू करणार आहे. उद्या ज्यांना उपोषणात बसायचं ते बसतील बाकी लोक येऊन पाठिंबा द्या. समाजाचा मला फक्त आशीर्वाद हवा आहे आम्ही गावा बरोबरच आणखी दुसऱ्या ठिकाणी लोकांसाठी उपोषणाला बसायला जागा करणार आहोत, या उपोषणाआधी सरकारशी कोणतीही चर्चा आम्ही केलेली नाही, असंही मनोज जरांगे पाटील म्हणालेत. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com