जाहिरात

MPSC Result : मराठा आरक्षणाचा MPSC निकालावर मोठा परिणाम; कटऑफ बदलामुळे EWS साठी सुगीचे दिवस!

मराठा समाज EWS मधून बाहेर पडल्याने या प्रवर्गातील समाजाला सुगीचे दिवस येण्याची शक्यता आहे.

MPSC Result : मराठा आरक्षणाचा MPSC निकालावर मोठा परिणाम; कटऑफ बदलामुळे EWS साठी सुगीचे दिवस!
EWS मधील प्रवर्गाला मात्र सुगीचे दिवस येणार

राहुल कुलकर्णी, प्रतिनिधी

MPSC Result : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 चा निकाल जाहीर झाला आहे. या निकालानंतर निवडलेले उमेदवार मुलाखतीस पात्र झाले आहे. यंदा हा आकडा 1 हजार 516 च्या घरात आहे. यंदाच्या निकालावर पाहिल्यास कट ऑफ वाढल्याचं दिसून येत आहे. यंदा खुल्या गटाचा कट ऑफ गेल्या सहा वर्षांच्या तुलनेत सर्वात जास्त असल्याचं दिसून येत आहे. 

गेल्या दीड वर्षात मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनादरम्यान मराठा समाजाला मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्राचं वाटप झालंय. भविष्यात ओबीसी प्रवर्गातील कट ऑफ अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सद्यपरिस्थितीत खुला गट, एसईबीसी आणि ओबीसीचे कट ऑफ जवळपास अनुक्रमे 507, 490, 485 इतके आहेत.

EWS प्रवर्गातील उमेदवारांचा सुगीचे दिवस

EWS प्रवर्ग अल्पसंख्यांक गटातून मराठा समाज बाहेर पडला. यामध्ये मुस्लीम, लिंगायत, ब्राम्हण, मारवाडी, जैन समाज राहिला आहे. यंदा या EWS प्रवर्गाचं कट ऑफ एससी आणि एसटी इतकं आहे. मराठा समाज ईडब्लूएस प्रवर्गातून बाहेर पडल्यामुळे या प्रवर्गातील उमेदवारांना सुगीचे दिवस येण्याची शक्यता आहे. भविष्यात याचा कट ऑफ कमी लागण्याची शक्यता आहे. 

गेल्या दीड वर्षात मोठ्या प्रमाणात मराठा समाज कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप झालं आहे. आता मराठा समाजातील विद्यार्थीही ओबीसीमधून परीक्षा देतील. त्यानंतर  ओबीसीचा कट ऑफ अधिक वाढेल आणि जो खुल्या प्रवर्गाइतका होईल असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. याचा परिणाम म्हणजे आरक्षणासह जे विद्यार्थी एमपीएससी परीक्षेला सामोरं जातील, त्यांना तीव्र स्पर्धेला सामोरं जावं लागेल. तर दुसरीकडे ईडब्लूएसमधील समाजासाठी हे अतिलाभदायक ठरेल असं दिसून येत आहे. 

मराठा समाजाला वेगळे आरक्षण दिल्याचा सर्वात मोठा परिणाम...

राज्य लोकसेवा आयोगानं मुख्य परीक्षा 2024 मध्ये घेतलेल्या परीक्षांचा निकाल जाहीर झाला आहे. कटऑफमध्ये ओबीसीसह सर्वच प्रवर्गाच्या गुणांचा टक्का वाढला आहे. 2022 च्या तुलनेत 20 गुणांची वाढ झाली आहे. पण आर्थिक दृष्ट्या प्रवर्गात मात्र 45 गुणांनी मेरीट कमी झाली. मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ दिल्याने EWS मधून समाज बाहेर पडला. या आरक्षणाचा ब्राम्हण आणि लिंगायत समाजाला मोठा फायदा झाला आहे. 431 जागांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये उपजिल्हाधिकारी, असिस्टंट कमिशनर, उपअधीक्षक, अबकारी विभागाच्या जागा आहे.

यंदा कोणत्या प्रवर्गाचा किती कटऑफ

खुला गट - 507
एसईबीसी - 490
ओबीसी - 485
एनटी - 463 
ईडब्ल्यूएस - 445 
एससी - 445.75
एसटी - 415

यंदा 1 हजार 516 विद्यार्थी मुलाखतीस पात्र

पुणे - 1004
छत्रपती संभाजीनगर - 143 
नाशिक - 111
नवी मुंबई - 108
नागपूर - 104
अमरावती - 46
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com