लक्ष्मण सोळुंके, जालना
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात उपोषणाची घोषणा केली आहे. येत्या 29 सप्टेंबर रोजी मनोज जरांगे उपोषणाला बसणार आहेत. मराठा आरक्षण आंदोलनाला वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आंतरवाली सराटी येथे बेठाकीचं आयोजन करण्यात आलं होते. तेथे मनोज जरांगे बोलत होते.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मनोज जरांगे यांनी यावेळी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मराठा आरक्षणाला खोडा बसला. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी ते प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केला. आपण समाजाला शब्द दिला आहे. कुणाचं कुटुंब उघड पडू देणार नाही.
( नक्की वाचा : 'शरद पवारांना हे शोभत नाही,' पुतळा कोसळल्याच्या प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांचा पलटवार )
यावेळी उपोषणाने आरक्षण मिळवायचं आणि आमदारही पाडायचे, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं. किती दिवस फडणवीस यांना आमचं बलिदान घ्यायचं आहे. किती गुन्हे दाखल करणार? आता आम्ही थांबायला तयार नाहीत. आम्ही कुणाचं वाईट केलेलं नाही. आरक्षणासाठी अनेक बलिदान गेले आहेत, मराठ्यांना आरक्षणाचा मी शब्द दिलेला आहे, असंही मनोज जरांगे यांनी म्हटलं.
(नक्की वाचा - महाराष्ट्रात 'सुपारी आघाडी' जन्माला येईल, दोन पुतणे एकत्र येतील! पवारांची सडकून टीका)
देवेंद्र फडणवीस समाजा-समाजात भांडण लावत आहेत. ते समोर न येता काड्या करतात. त्यामुळे 29 सप्टेंबर रोजी मी आमरण उपोषण करणार आहे. मराठा समाजाला निराशा होऊ देणार नाही. मी हताश झालेलो नाही, उपोषण हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. त्यासाठी मी आरपार आमरण उपोषण करणार आहे, असा इशारा देखील मनोज जरांगे यांनी दिला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world