Beed News : बीडमधील मस्साजोग येथील सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. यात स्वरूपानंद देशमुख यांनी बाजी मारली आहे. त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवार अश्विनी देशमुख यांचा पराभव करत सरपंचपदावर आपली मोहोर उमटवली.
माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर रिक्त झालेल्या या जागेसाठी ही निवडणूक अत्यंत भावनिक आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात होती. संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख रिंगणात असल्यामुळे ही निवडणूक एकतर्फी होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता.
मात्र, मतदारांनी स्वरूपानंद देशमुख यांच्या बाजूने कौल देत या निकालाने अनेकांना धक्का दिला आहे. या पोटनिवडणुकीत 84 टक्के विक्रमी मतदान झाले होते, ज्यातून मतदारांमधील उत्सुकता दिसून आली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world