- पंकजा मुंडे यांनी परळीतील कार्यक्रमात विद्यार्थी असताना डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण न झाल्याचे सांगितले
- अपेक्षित गुण न मिळाल्यामुळे पंकजा मुंडे यांनी वैद्यकीय क्षेत्राचा नाद सोडून राजकारणात पदार्पण केले
- पंकजा मुंडे यांच्या भावंडांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये करिअर करणाऱ्या सदस्यांचा उल्लेख केला
आकाश सावंत
राज्याच्या राजकारणात नेतृत्व करणाऱ्या पंकजा मुंडे यांनी आपल्या विद्यार्थी दशेतील एका महत्त्वाच्या निर्णयावर प्रकाश टाकला आहे.परळी येथे डॉक्टरांच्या स्नेहमिलन कार्यक्रमात त्यांनी संवाद साधला. "विद्यार्थी असताना मला डॉक्टर बनण्याची इच्छा होती, पण अपेक्षित गुण न मिळाल्याने मी तो नाद सोडला. नियतीला कदाचित मी राजकारणात येणे मान्य होते," असे विचार त्यांनी मांडले. पंकजा मुंडे नेहमीच आपल्या रोखठोक भाषणांसाठी ओळखल्या जातात, मात्र परळीतील या कार्यक्रमात त्यांनी आपल्या मनातील एक हळवा कोपरा उघड केला.
राजकारण की वैद्यकीय क्षेत्र?
बीड जिल्ह्याच्या राजकारणात आणि समाजकारणात सक्रिय असणाऱ्या पंकजा मुंडे यांनी नुकत्याच एका सार्वजनिक कार्यक्रमात आपल्या आयुष्यातील एका अपूर्ण राहिलेल्या स्वप्नाचा उलगडा केला. "मला खरं तर डॉक्टर व्हायचं होतं, पण काही कारणांमुळे ते स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही," अशी प्रांजळ कबुली त्यांनी दिली. परळी येथे डॉक्टरांसाठी आयोजित एका विशेष कार्यक्रमात त्या बोलत होत्या. प्रीतम ताईंना वकील व्हायचं होतं, परंतु त्या डॉक्टर झाल्या. तर येशू ताई वकील झाल्या असं सांगायला त्या विसरल्या नाहीत.
कौटुंबिक स्वप्नांची अदलाबदल
यावेळी पंकजा मुंडे यांनी आपल्या भावंडांच्या करिअरमधील योगायोगांवरही भाष्य केले. त्या म्हणाल्या की, प्रीतम मुंडे यांना वकील व्हायचे होते, मात्र त्या डॉक्टर झाल्या. दुसरीकडे, यशश्री मुंडे वकील झाल्या. पंकजा मुंडे स्वतःला डॉक्टर व्हायचे होते, पण मार्कांमुळे त्यांनी प्रवेश घेतला नाही आणि त्या राजकारणात सक्रिय झाल्या. या सर्व प्रवासात केवळ धनंजय मुंडे हेच असे आहेत, ज्यांना राजकारणात यायचे होते आणि ते आज यशस्वी राजकारणी आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
राजकीय टोलेबाजी आणि हास्यकल्लोळ
कार्यक्रमात व्यासपीठावर धनंजय मुंडे देखील उपस्थित होते. यावेळी डॉक्टरांच्या समस्यांबाबत बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, "डॉक्टरांना काहीही मदत लागली तर मी आणि धनुभाऊ तुमच्या पाठीशी आहोत." यावेळी धनंजय मुंडेंनी पैशांच्या खर्चाचा विषय काढला. त्यावर पंकजा मुंडेंनी दिलेल्या उत्तराने कार्यक्रमात मोठी करमणूक झाली आणि राजकीय मतभेद बाजूला ठेवून दोन्ही नेते हसताना दिसले. शिवाय डॉक्टरांसाठी कोणती ही अडचण असेल तर मदतीचे आश्वासन ही यावेळी देण्यात आले. यावेळी धनंजय मुंडे यांच्यासोबत झालेली त्यांची हलकी-फुलकी टोलेबाजी चर्चेचा विषय ठरली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world