जाहिरात

Beed News: अश्विनी देशमुख जिंकणार की हरणार? मस्साजोगचा सरपंच कोण? आज ठरणार

Beed News: मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर रिक्त झालेल्या सरपंचपदासाठी आज मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख आणि त्यांचे प्रतिस्पर्धी स्वरूपानंद देशमुख यांच्यात थेट लढत आहे.

Beed News: अश्विनी देशमुख जिंकणार की हरणार? मस्साजोगचा सरपंच कोण? आज ठरणार

आकाश सावंत, बीड

Massajog Bypoll Results Today: दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर रिक्त झालेल्या या जागेसाठी मस्साजोग ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडत आहे. ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज सकाळी 10 वाजेपासून तहसील कार्यालयात कडेकोट पोलीस बंदोबस्तात सुरू होत आहे. निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. 

निवडणुकीचे महत्त्व आणि पार्श्वभूमी

मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांची झालेली हत्या ही संपूर्ण राज्यासाठी धक्कादायक घटना होती. यानंतर रिक्त झालेल्या सरपंचपदासाठी मंगळवारी 84 टक्के मोठ्या प्रमाणावर मतदान झाले. या निवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख आणि त्यांचे प्रतिस्पर्धी स्वरूपानंद देशमुख यांच्यात थेट सामना आहे. 

(नक्की वाचा-  Thane News: ठाणेकरांची चिंता वाढली! 3 दिवसांत 6 मुले गायब, नेमकं काय घडतंय?)

विशेष म्हणजे, मागील निवडणुकीत स्वरूपानंद देशमुख हे संतोष देशमुख यांच्याकडून पराभूत झाले होते. संतोष देशमुखांच्या हत्येचे भावनिक सावट आणि गावकऱ्यांमधील तीव्र भावना यामुळे ही निवडणूक केवळ एक पोटनिवडणूक न राहता चर्चेचा विषय बनली आहे.

मतदानाचे आकडे 

  • एकूण मतदार: 2084 पैकी 1744 मतदारांनी आपला हक्क बजावला.
  • मतदानाची टक्केवारी: 84%  मतदान.
  • निकाल: आज सकाळी 10 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून, दुपारी 12-1 वाजेपर्यंत कल स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

(नक्की वाचा-  Chandrapur News: चंद्रपूर हादरलं! मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर रुग्णांसोबत भयंकर घडलं; रुग्णालय सील)

निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप झाले होते. संतोष देशमुखांच्या हत्येची पार्श्वभूमी असल्याने गावात आणि मतमोजणी केंद्रावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. निकालानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासन सतर्क आहे. केवळ निकालानंतर कुणीही गुलाल उधळणार नसल्याची भूमिका दोन्ही बाजूने घेण्यात आली आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com