जाहिरात

MHADA House Prices : सर्वसामान्यांसाठी Good News; म्हाडाची घरं स्वस्त होणार

म्हाडाच्या घरांच्या किमती कमी होणार असल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

MHADA House Prices : सर्वसामान्यांसाठी Good News; म्हाडाची घरं स्वस्त होणार

MHADA Houses :  सिडको आणि म्हाडा ही सर्वसामान्यांना हक्काचं घर देणारी संस्था. मात्र गेल्या काही वर्षात या घरांच्या किमती वाढल्याने सर्वसामान्यांकडून मोठी निराशा व्यक्त केली जात होती. सिडकोकडून माझ्या पसंतीचे घर ही योजना जाहीर करण्यात आली. मात्र घरांच्या किमती जास्त असल्यांमुळे सर्वसामान्यांकडून संताप व्यक्त करण्यात आला होता. मनसेनेही यासंदर्भात आंदोलन पुकारलं होतं. त्यानंतर सिडकोच्या घराच्या किमती कमी करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात होतं. दरम्यान सर्वसामान्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. म्हाडाच्या घराच्या किमती कमी होणार असल्याची माहिती आहे. लवकरच नव्या किमती जाहीर करण्यात येणार आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

गेल्या काही वर्षांपासून म्हाडाच्या घराच्या अव्वाच्या सव्वा किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. त्यामुळे यावरुन सरकारवर निराशा व्यक्त केली जात होती. दरम्यान म्हाडांच्या घरांच्या किमती निश्चित करण्याबाबत पुनर्चना करण्यात येणार आहे. यासाठी त्रिसदस्यीय समितीची नेमणूक करण्यात आली आहे. या समितीमार्फत म्हाडाची घरं स्वस्त करण्यासाठी आणि परिणामी म्हाडाला प्रत्यक्षात नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. यासंदर्भात समितीमार्फत अभ्यास केला जाणार आहे.

CIDCO News: सिडकोच्या घरांच्या किंमती कमी होणार? शिंदेंचा एक आदेश अन् लॉटरीधारकांच्या आशा पल्लवीत

नक्की वाचा - CIDCO News: सिडकोच्या घरांच्या किंमती कमी होणार? शिंदेंचा एक आदेश अन् लॉटरीधारकांच्या आशा पल्लवीत

येत्या तीन महिन्यात या समितीमार्फत अहवाल उपाध्यक्षांकडे दिला जाणार असून मंजुरीसाठी सरकारकडे पाठवला जाणार आहे. सर्वसाधारणपणे सध्याचा जमिनीचा खर्च, बांधकाम खर्च आणि आस्थापन खर्चाचा विचार करून म्हाडाच्या घरांच्या किमती ठरवल्या जातात. म्हाडा यामध्ये अत्यल्प आणि अल्प गटातून शून्य टक्के नफा तर मध्यम उत्पन्न गटातून दहा टक्के, उच्च उत्पन्न गटातून 15 टक्के नफा घेऊ शकते. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: