जाहिरात

Rohit Pawar: विमान मुद्दाम आपटलं, घातपातामागचे राजकारण काय? रोहित पवारांनी मांडले 10 स्फोटक मुद्दे; वाचा...

Rohit Pawar PC On Ajit Pawar Death: पायलटनेच मुद्दाम विमान पाडल्याचा सर्वात मोठा आरोप केला आहे. जाणून घ्या रोहित पवार यांच्या या स्फोटक पत्रकार परिषदेमागील 10 महत्त्वाचे मुद्दे! 

Rohit Pawar: विमान मुद्दाम आपटलं, घातपातामागचे राजकारण काय? रोहित पवारांनी मांडले 10 स्फोटक मुद्दे; वाचा...

MLA Rohit Pawar PC 10 Big Points:  राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावरुन संशय व्यक्त केला जात आहे. आज राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत या अपघातावरुन महत्त्वाचा खुलासा केला. या अपघाताचा तपास योग्य रित्या केला जात नाही, असा आरोप करत रोहित पवार यांनी 28 जानेवारी रोजीचा संपूर्ण घटनाक्रम पुन्हा एकदा सांगितला. तसेच पायलटनेच मुद्दाम विमान पाडल्याचा सर्वात मोठा आरोप केला आहे. जाणून घ्या रोहित पवार यांच्या या स्फोटक पत्रकार परिषदेमागील 10 महत्त्वाचे मुद्दे! 

रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्त्वाचे मुद्दे! 

विमानात अतिरिक्त इंधन: विमान अपघाताचा एक नवीन व्हिडिओ आला आहे. त्यामध्ये स्फोट झाल्याचे दिसत आहे. गेल्या वेळेस आम्ही अतिरिक्त इंधनाचा मुद्धा उपस्थित केला होता. विमानामध्ये मागील बाजूस Fuel चे अतिरिक्त कंम अवैधरीत्या ठेवल्याची शंका होती. 

जास्त इंधन असल्यामुळेच स्फोट:  अतिरिक्त इंधनामुळेच विमानात जास्त स्पोट झाल्याची शक्याता नाकारता येत नाही. मुंबईवरुन हे विमान जात असताना फुल टँक भरलेला होता. ते फुल का भरले गेले? बारामतीनंतर हैद्राबादमध्येही भरु शकला असता.

पायलटने मुद्दाम विमान आपटले:  एवढे फ्युल घेऊन बारामतीच्या दिशेने जाण्याचे कारण काय? पायलटचा वापर करुन मुद्दाम हा घातपात झाला असावा. धुके असताना उड्डाण घ्यायला नको होते. उड्डाण केले तरी लँड करण्याचा प्रयत्न करायला नको होते. परत मुंबईला यायला हवे होते. मात्र विमानात आठ अधिकचे फ्युल टँक होते. विमान परत नेण्याऐवजी मुद्माम आढळण्यात आले. असा आमचा आरोप आहे. 

ब्लॅक बॉक्स कसा जळाला?:  ब्लॅक बाँक्स जळला हे मुद्दाम मॅन्युप्युलिशन आहे. 11 डिग्री सेल्सिअसमध्येच ब्लॅक बॉक्सला फटका बसू शकतो. जर ६००० मीटर खोलीपर्यंत पाण्याचे प्रेशर असेल तरी ब्लॅक बॉक्स टिकू शकतो. त्या ठिकाणी कागदही न जळलेले दिसले. याआधी सर्व अपघातांमध्ये ब्लॅक बॉक्स सुरक्षित होता. 

Rohit Pawar: 'अजित पवारांच्या विमानाची गॅरंटी संपलेली, फक्त 85 तास..', रोहित पवारांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

कंपनीचा हलगर्जीपणा:  जर पायलटने Legacy विमानाचे प्रशिक्षण घेतले असेल तर तो केवळ Legacy उडवू शकतो. Learjet उडवू शकत नाही. मात्र VSR मध्ये पायलटांकडून कोणतीही विमाने उडवून घेतली जात होती. रोहित सिंग आणि सुमित कपूर हे दोघेही Legacy तसेच Learjet ही दोन्ही विमाने उडवत होते. तसेच BA टेस्ट नियमितपणे घेतल्या जात नव्हत्या. टेस्टचे विडिओ रेकॉर्डिंग केले जात नव्हते. अनेक वेळा फ्लाइटपूर्वी (pre-flight) पायलटची BA टेस्ट केलेली नसायची.

विमानाची गॅरंटी संपलेली:  व्हीएसआर विना जास्त काळ उडवायचे, विमानाची इंजिन लाईफ संपली होती.  अजित दादा विमानात बसले होते त्याला ५९१५ तास झाले होते म्हणजे फक्त ८५ तास बाकी होते. त्यामुळे हे विमान आधीच संपले होते, ते पडले तरी तोटा झाला नसता. 

खराब विमान मुद्दाम दिले: अजित पवार हे झेडप्लस सिक्युरिटी असलेले व्यक्त आहेत. मग असे खराब झालेले मशिन कसे काय अजित पवार यांच्या सेवेसाठी दिले. इतके दुर्लक्ष कसे केले गेले?" असा सर्वात मोठा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. 

व्हीएसआरला वाचवण्याचा प्रयत्न:  सत्तेतील काही लोकांकडून व्हीएसआर कंपनीला वाचवले जात आहे. व्हीअसआर कंपनी चौकशी करावी देशातील विरोधी पक्ष नेते, आमच्या कुटुंबातील सदस्य, एक जज घ्यावे सीबीआय चौकशी सोबत समिती असावी.

लग्नाला हजेरी:  व्हीएसआर कंपनीवर कारवाई का नाही याची खोलात गेलो, काही काळ आधी  रोहित सिंग याचे लग्न झाले. या लग्नाला कोण कोण गेले होते. त्याची माहिती समोर आली. महाराष्ट्रातीलही काही नेते या लग्नाला होते. सत्तेतील टीडीपी पक्षाचे प्रमुख नेते लग्नात होते.

Rahit Pawar: अजितदादांच्या अपघाताआधीचं 'ते' ट्वीट काही मिनिटात डिलिट; रोहित पवारांचा खळबळजनक खुलासा

घातपातामागचे राजकारण काय? हा जर घातपात असेल तर त्यामागे कोणते राजकारण असू शकते, याच्या दोन शक्यता आहेत. विलिनीकरणामुळे एनडीए सोबत आम्ही जाणार किंवा अजित दादा सत्तेतून बाहेर पडणार होते. यामुळे एक गट नाराज झाला असता त्यामुळे  कदाचित हे नको होते, असा गट या मागे असू शकतो.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com