जाहिरात

Gudi Padwa Melava 2025: राज ठाकरेंचा पुन्हा 'लाव रे व्हिडिओ', महाकुंभावरुन घणाघात, हिंदूत्वावरुन थेट इशारा

MNS Gudi Padwa Melava 2025 Raj Thackeray Speech: लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीत झालेला दारुण पराभव, राज्यात सुरु असलेला धार्मिक वाद, औरंगजेब कबरीवरुन घमासानामुळे ढवळून निघालेल्या राजकीय वातावरणावर राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

Gudi Padwa Melava 2025: राज ठाकरेंचा पुन्हा 'लाव रे व्हिडिओ', महाकुंभावरुन घणाघात, हिंदूत्वावरुन थेट इशारा

MNS Gudi Padwa Melava 2025:  राज्यभरात गुढी पाडव्याचा आणि मराठी नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष सुरु आहे. दुसरीकडे मुंबईमध्ये शिवाजी पार्क मैदानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाडवा मेळावा पार पडत आहे. लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीत झालेला दारुण पराभव, राज्यात सुरु असलेला धार्मिक वाद, औरंगजेब कबरीवरुन घमासानामुळे ढवळून निघालेल्या राजकीय वातावरणावर राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काय म्हणाले राज ठाकरे?

"जमलेल्या माझ्या मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो.. सर्वांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देतो.. हा म्हणे हारलेला पक्ष निवडणुका संपल्या सगळ्या गोष्टी झाल्या. गेल्या निवडणुकीमध्ये ज्यांनी मतदान करुन ज्यांची मत दिसली त्या सर्व मतदारांचे मी आभार मानतो. आणि ज्या मतदारांनी मनसेला मतदान करुन देखील इलेक्टोनिक मशिनमध्ये मते दिसली नाहीत, त्यांचेही आभार..', असे राज ठाकरे म्हणाले. 

"जे झालं ते झालं आता बघायचं ते पुढचं आज बरंच बोलायचं आहे मला. अनेक विषय झाले, अनेक विषय बोलले गेले. सदिच्छांचे शुभेच्छांचे फोन आले नेमके आजच आले, आज का आले याचे अर्थ मला समजतात. जरा जपून.. पण गेले काही दिवस ज्या घटना घडल्या त्या सांगणे गरजेचे आहे. पहिला विषय म्हणजे कुंभमेळा.

नक्की वाचा - Kalyan News: कल्याण अपहरणाची हादरवणारी Inside Story, 'त्या' एका गोष्टीमुळे शिजला कट

"नव्याने वारं शिरलेल्या हिंदूत्ववाद्यांना वाटलं मी कुंभमेळ्याचा अपमान केला. मूर्ख आहात का... ज्या नद्यांना आपण माता मानतो अत्यंत भीषण अवस्था आहे. ज्या नद्यांकडे आपल्या राज्यकर्त्यांचा.. गंगा साफ करावी अशी बोलणारी पहिली व्यक्ती म्हणज राजीव गांधी. तेव्हापासून अजून गंगा साफ करतच आहेत. त्यानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले.आपल्याकडच्या नद्यांची अवस्था आहे तिथले पाणी पिऊ शकत नाही. काही लोकांनी मला सांगितलं की लाखो लोक तिथ गेल्यानंतर अंघोळ केल्यानंतर आजारी पडली, असा दावा करत राज ठाकरे यांनी थेट नदी प्रदूषणाचे व्हिडिओ दाखवले.

 "हे प्रदूषण थांबवले जाऊ शकत नाही. ही गंगेची परिस्थिती. हा कोणता धर्म आहे. तिकडच्या घाटांवर प्रेते जाळली जातात. नुसता अग्नी दिल्यासारख करतात अन् प्रेत ढकलून देतात. हा कोणता धर्म? आमच्या नैसग्रिक गोष्टींवर धर्म अशाप्रकारे आडवा येत असेल तर काय करायंच त्याचं? आपल्या नद्या स्वच्छ राहिल्या पाहिजेत. या नद्यांवरील भाग इतके गलिच्छ आहेत,या नद्या आपणच बरबाद करतोय... अशा शब्दात राज ठाकरेंनी हल्लाबोल केला. 

Kolhapur News : सरकारी शाळेत प्रवेशासाठी पालकांची आदल्या रात्रीपासून तोबा गर्दी; खासगी शाळेला देतेय टक्कर