जाहिरात

मनसेला मोठा धक्का! मुंबईतील बड्या नेत्याने शिवबंधन बांधलं; ठाकरेंच्या भाच्याला विजयी करण्याचा विडाही उचलला

मनसे विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस तसेच वांद्रे उपविभाग प्रमुख अखिल चित्रे यांनी राज ठाकरेंची साथ सोडत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशानंतर त्यांनी राज ठाकरेंवर गंभीर आरोप केलेत.

मनसेला मोठा धक्का! मुंबईतील बड्या नेत्याने शिवबंधन बांधलं; ठाकरेंच्या भाच्याला विजयी करण्याचा विडाही उचलला

देवेंद्र कोल्हाटकर, प्रतिनिधी:

 राज्याच्या राजकारणात सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. विधानसभा निवडणुका महत्वाच्या टप्प्यावर आल्या असतानाच मुंबईमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला आहे. मनसे विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस तसेच वांद्रे उपविभाग प्रमुख अखिल चित्रे यांनी राज ठाकरेंची साथ सोडत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशानंतर त्यांनी राज ठाकरेंवर गंभीर आरोप केलेत. मनसेने उमेदवार जिंकण्यासाठी नाही तर दुसऱ्याचे उमेदवार पाडण्यासाठी उभे केले, असा घणाघात चित्रे यांनी केला आहे.

काय म्हणाले अखिल चित्रे? 

"अठरा वर्षे मी मनसेमध्ये काम केले. मात्र जो पक्ष ज्या विचारांसाठी सुरू झाला होता ते विचार बाजूला ठेवून हा पक्ष चालत आहे, त्यामुळे मी पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेना उमेदवार जिंकून आणण्यासाठी नाही दुसऱ्याचा उमेदवार पाडण्यासाठी निवडणूक लढत आहे. राज ठाकरे म्हणाले होते की मी दुसऱ्याचे लेकरं माझ्या अंगाखांद्यावर खेळवणार नाही, मग ज्या तृप्ती सावंत तीन-चार पक्ष बदलून आल्या, त्यांना एका रात्री तुम्ही उमेदवारी देता ते सुद्धा दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला पाडण्यासाठी... " असे म्हणत अखिल चित्रे यांनी थेट मनसे अध्यक्षांवर निशाणा साधला. 

नक्की वाचा: 'छत्रपतींचा पुतळा कोसळला फडणवीसांनी माफी का मागितली नाही?' ठाकरेंचा पलटवार

'वरुण सरदेसाईंना निवडून आणणार..'

"महायुतीत तृप्ती सावंत जिशान सिद्दिकी यांच्यासोबत बैठका घेतात आणि वरूण सरदेसाई यांना पाडण्यासाठी ते साथ देत आहेत. तृप्ती सावंत जिंकण्यासाठी लढल्या असत्या तर मी त्यांच्यासोबत असतो पण कोणालातरी पाडण्यासाठी तुम्ही जर निवडणूक लढवत असाल तर ते योग्य वाटत नाही. आता आधीच्या पक्षाला ज्याला पाडायचं होतं त्याला मी पाडू देणार नाही ही जबाबदारी आता माझी आहे. वरुण सरदेसाई यांना जिंकून आणायची जबाबदारी आता माझी आहे.." असे म्हणत चित्रे यांनी यावेळी ठाकरे गटाचे उमेदवार वरुण सरदेसाई यांना निवडून आणण्याचा विडाही उचलला. 

ट्रेडिंग बातमी: मनोज जरांगेंचं ठरलं! २५ दिवसानंतर पुन्हा एल्गार, विधानसभेची खास रणनितीही सांगितली; वाचा संपूर्ण मुलाखत

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: