अमित ठाकरेंनी आमच्या मतदारसंघातून लढावे! मनसेच्या पदाधिकाऱ्याने व्यक्त केली इच्छा

पहिल्यांदाच आमदार झालेल्या आदित्य ठाकरेंच्या गळ्यात मंत्रिपदाची माळही पडली होती. निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेलेल ठाकरे कुटुंबातील आदित्य ठाकरे हे पहिले व्यक्त ठरले होते.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

ठाकरे कुटुंबातील (Thackeray Family) आणखी एका व्यक्तीने विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची तयारी सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे. वरळी विधानसभा (Worli Assembly) मतदारसंघातून आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी निवडणूक लढवली आणि ते जिंकूनही आले. पहिल्यांदाच आमदार झालेल्या आदित्य ठाकरेंच्या गळ्यात मंत्रिपदाची माळही पडली होती. निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेलेल ठाकरे कुटुंबातील आदित्य ठाकरे हे पहिले व्यक्त ठरले होते. रिमोट कंट्रोलच्या राजकारणाला छेद देण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. आदित्य यांच्यानंतर त्यांचे चुलत बंधू अमित ठाकरे देखील निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.  सोमवारी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली होती. यामध्ये अमित यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याचे सांगण्यात येत आहे. बदल घडवायचा असेल तर काठावर बसून राजकारण करणे आता योग्य ठरणार नाही त्यासाठी स्वत: उतरावे लागेल असे मत त्यांनी व्यक्त केल्याचे कळते आहे. मनसेची ही बैठक मुंबईतील सगळ्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी बोलावण्यात आली होती. अमित ठाकरे कुठून निवडणूक लढवणार हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी त्यांच्यासाठी माहीम, भांडूप आणि मागाठाणे हे तीन मतदारसंघ  सेफ मतदारसंघ असल्याचे बोलले जात आहे. 

हे ही वाचा: राज ठाकरें शिवाय मनसेची बैठक

पदाधिकाऱ्याची फेसबुक पोस्ट

मनसेचे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली आहे.यामध्ये त्यांनी अमित ठाकरे यांनी भांडूप विधानसभा मतदारसंघातून लढावे अशी इच्छा व्यक्त केली आहे. भांडूप विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे यांची उमेदवारी जाहीर करावी अशी मागणीच चव्हाण यांनी केली आहे.

भांडूप विधानसभा मतदारसंघातून गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे रमेश कोरगांवकर निवडून आले होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर रमेश कोरगांवकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला होता.  

हे ही वाचा: चित्रपटाच्या पोस्टरवर झळकले राज ठाकरे, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यापूर्वी प्रदर्शित होणार चित्रपट

मनसेचा 225 पर्यंत जागा लढण्याचा निर्धार

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना 200 ते 225 जागा लढणार असल्याचे सांगितले होते. यानंतर राज ठाकरे यांनी विदर्भ आमि मराठवाड्याचा दौराही केला होता. या दौऱ्यादरम्यान त्यांनी मनसेचे काही उमेदवार जाहीर केले आहेत. हे उमेदवार खालीलप्रमाणे आहेत. 

  1. बाळा नांदगावकर - शिवडी, मुंबई
  2. दिलीप धोत्रे - पंढरपूर  
  3. लातूर ग्रामीण - संतोष नागरगोजे
  4. हिंगोली विधानसभा - बंडू कुटे
  5. चंद्रपूर - मनदीप रोडे
  6. राजुरा - सचिन भोयर

याशिवाय मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी वरळीतून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार असून संदीप देशपांडे यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आणि ती पक्षाने कायम ठेवली तर इथे तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरे हे इथून महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, तर महायुतीतर्फे इथून कोण असेल याबाबत अद्याप कळू शकलेले नाहीये. 

Topics mentioned in this article