जाहिरात

Monsoon Update: अखेर महाराष्ट्रात मान्सून धडकणार! 'या' दिवसापासून धो धो पाऊस; हवामान विभागाची मोठी अपडेट

हवामान विभागाच्या मते, मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी पोषक वातावरण तयार होत असून, यामुळे महाराष्ट्र, तेलंगणा, ओडिशा आणि बिहारच्या उर्वरित भागांत पाऊस सक्रिय होईल.

Monsoon Update: अखेर महाराष्ट्रात मान्सून धडकणार! 'या' दिवसापासून धो धो पाऊस; हवामान विभागाची मोठी अपडेट

Maharashtra Rain Update: राज्यातील नागरिक सध्या उकाड्याने त्रस्त असून पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मान्सूनच्या आगमनाच्या अनेक तारखा उलटल्यानंतर, आता भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलासादायक बातमी दिली आहे. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, २३ जूनपासून नैऋत्य मोसमी पावसाची महाराष्ट्रात वाटचाल सुरू होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या मते, मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी पोषक वातावरण तयार होत असून, यामुळे महाराष्ट्र, तेलंगणा, ओडिशा आणि बिहारच्या उर्वरित भागांत पाऊस सक्रिय होईल.

BEST Strike: चर्चा निष्फळ, बेस्टचा संप आजही सुरुच! मुंबईकरांचे प्रचंड हाल; 'मेट्रो' मात्र मालामाल

मान्सूनबाबत मोठी बातमी 

​मात्र, या विलंबामुळे राज्यातील कृषी क्षेत्रावर गंभीर परिणाम झाले आहेत. विशेषतः मराठवाड्यात खरीप हंगामाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. आकडेवारीवर नजर टाकल्यास, मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत ४८ लाख हेक्टरवर पेरण्या अपेक्षित असताना आतापर्यंत केवळ १० हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे, त्यांनीच कापूस आणि इतर पिकांची लागवड केली आहे.

पावसाअभावी सोयाबीन, तूर, मका आणि मूग यांसारख्या मुख्य पिकांच्या पेरण्या रखडल्या असून, सिंचनाची सुविधा नसलेल्या शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे. ​हवामानतज्ज्ञ सुदीप कुमार यांनी स्पष्ट केले की, २२ जूनपासून दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मात्र, पुण्यात सध्या हवामानात फारसा बदल होणार नाही आणि पुढील काही दिवस तिथे पावसाची चिन्हे नाहीत.

‘एल निनो'च्या प्रभावामुळे मान्सूनच्या गतीवर परिणाम झाला असून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील पावसाचा अचूक अंदाज जूनच्या अखेरीस स्पष्ट होईल. सध्या तरी बीड, जालना यांसारख्या जिल्ह्यांत पेरणीचे प्रमाण अत्यंत कमी असून, बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.

BT Deshmukh: विदर्भाच्या शिक्षक चळवळीचा महामेरू हरपला! प्रा. डॉ. बी. टी. देशमुख यांचे निधन

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com