जाहिरात

Mumbai Air Quality : जगातील दुसरं सर्वाधिक प्रदूषित शहर! दिवाळीत मुंबईतील हवेची गुणवत्ता धोकादायक पातळीवर

गेल्या आठवडाभरापासून दिवाळीनिमित्त फटाक्यांची आतिषबाजी होत आहे. याचा परिणाम हवेच्या गुणवत्तेवर होत असल्याचं दिसून येत आहे.

Mumbai Air Quality : जगातील दुसरं सर्वाधिक प्रदूषित शहर! दिवाळीत मुंबईतील हवेची गुणवत्ता धोकादायक पातळीवर

Mumbai Air Quality  : दिवाळीनिमित्ताने घरोघरी आनंदाचं वातावरण आहे. गेल्या आठवडाभरापासून दिवाळीनिमित्त फटाक्यांची आतिषबाजी होत आहे. याचा परिणाम हवेच्या गुणवत्तेवर होत असल्याचं दिसून येत आहे. अनेक शहरांमध्ये हवेच्या प्रदूषणाचा स्तर 200 च्या वर पोहोचला आहे. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये वातावरणाचा स्तर 221 AQI पर्यंत पोहोचला आहे. 20 ऑक्टोबरला येथे हवेची गुणवत्ता गंभीर स्तरापर्यंत पोहोचली होती.

सर्वात भयंकर अवस्था बीकेसीची होती. येथील हवेची गुणवत्ता AQI 300 च्या पार केली होती. तर कुलाबा (210), देवनार (207), खेरवाडी (214), माझगाव (196), शिवाजी नगर (169), मालाड (162), भायखळा (161)  या भागात हवेचं प्रदूषण धोकादायक स्तरापर्यंत पोहोचलं आहे. IQAir च्या जागतिक रिपोर्टनुसार, जगातील सर्वात प्रदूषण शहरांमध्ये सहाव्या क्रमांकावर असलेली मुंबई थेट दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. या यादीत दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे. तर कोलकात्ता तिसऱ्या क्रमांकावर आहे. 

Air Pollution पासून वाचण्यासाठी हे आहेत 5 घरगुती उपाय, तुम्हाला मिळेल नक्की आराम

नक्की वाचा - Air Pollution पासून वाचण्यासाठी हे आहेत 5 घरगुती उपाय, तुम्हाला मिळेल नक्की आराम

दुसरीकडे दिल्लीत मंगळवारी, २१ ऑक्टोबर रोजी सकाळी विषारी हवा पाहायला मिळाली. सोमवारी सायंकाळी दिल्लीत ३८ निरीक्षण केंद्रांवरील ३४ ठिकाणांवरील प्रदूषणाचा स्तर रेड झोनमध्ये नोंदविण्यात आला होता. रेड झोन म्हणजे अत्यंत खराब ते गंभीर हवेची गुणवत्ता. सोमवार-मंगळवारदरम्यान रात्री दिल्लीत प्रदूषणाचा स्तर वाढला होता आणि AQI ५३१ पर्यंत दाखल करण्यात आला आहे. दिल्लीतील हवा आधीच विषारी झाली आहे. दिवाळीत फटाक्यांमुळे हवेची गुणवत्ता अधिक ढासळली आहे. 

प्रदूषण वाढलेली ठिकाणं (AQI संकेतस्थळानुसार...)

छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट - २००

मालाड - २२०

मालाड पश्चिम - २२१

नेव्ही नगर कुलाबा - २५७

शीव - १९१

माझगाव - १९८

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com