ऋतिक गणकवार, मुंबई:
Mumbai jewelry Shop Robbery: मुंबईमध्ये एका सराफ दुकानातून तब्बल 6.79 कोटी रुपयांच्या दागिन्यांची चोरी झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. बोरीवली भागातील एम.एच.बी. पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या या चोरीचा पोलिसांनी 48 दिवसात छडा लावत आरोपींच्या मुसक्या आवळल्या. यासाठी मुंबई पोलिसांनी राजस्थानच्या घनदाट जंगलात थर्मल ड्रोनचा वापर करुन आरोपींचा शोध घेतला.
मुंबईत 6.79 कोटींची चोरी
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुंबईतील बोरीवली भागातील एका सराफ दुकानावर दरोडा घालण्यात आला होता. १३ जानेवारी २०२६ रात्री ते १४ जानेवारी पहाटेदरम्यान दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी तिजोरी फोडत सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. या दुकानातून 6.79 कोटी रुपयांच्या दागिन्यांची चोरी करण्यात आली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसां विशेष तपास पथकाची स्थापना करत शोधमोहिम सुरु केली.
Nashik News: नाशिक हादरलं! दोन मुलींचे वेगवेगळ्या ठिकाणांहून अपहरण, पालक चिंतेत
48 दिवसात पोलिसांनी घेतला शोध
यामध्ये प्रभू सिंग आणि नारायण सिंग या दुकानात काम करणाऱ्यांनीच ही चोरी केल्याचे उघड झाले आहे. या दोघांनी बनावट चावीचा वापर करून तिजोरीतील दागिने लुटले होते. पोलिसांनी या दोघांचा शोध घेण्यास सुरुवात केली असता हे दोघे राजस्थानमधील राजसमंद जिल्ह्यातील जंगल परिसरात असल्याचे दिसून आले होते. पोलिसांनी या जंगलात शिरून आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली.
आरोपी सतत आपले ठिकाण बदलत असल्याने त्यांना अटक करणे अवघड झाले होते. मात्र पोलिसांनी चिकाटी सोडली नाही. पोलिसांनी थर्मल ड्रोनचा वापर करत घनदाट जंगलात लपलेल्या या आरोपींचा शोध लावला आणि त्यांना अटक केली. गणपत सिंग, किशन सिंग आणि मोड सिंग यांनी आरोपींना मदत केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत 4 जणांना अटक केली आहे.
Mumbai ATS Raid: ब्रेकिंग! मुंबईत 4 ठिकाणी ATSची छापेमारी, चौघे ताब्यात; दहशतवादी कनेक्शनचा संशय
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world