जाहिरात

Mumbai-Goa Bus Accident : मुंबई-गोवा मार्गावर भीषण अपघात, 35 प्रवाशांना घेऊन जाणारी खासगी बस पलटली

मुंबई-गोवा मार्गावरील कर्नाळा खिंडीत एका खासगी बसचा भीषण अपघात झाल्याचं वृत्त समोर आलं आहे.

Mumbai-Goa Bus Accident : मुंबई-गोवा मार्गावर भीषण अपघात, 35 प्रवाशांना घेऊन जाणारी खासगी बस पलटली

मुंबई-गोवा मार्गावरील कर्नाळा खिंडीत एका खासगी बसचा भीषण अपघात झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. ४ मेच्या रात्री उशीरा हा अपघात झाल्याची माहिती आहे, या अपघाताबद्दल मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. हा बस इतका भीषण होता की अपघातानंतर खासगी बस पलटी झाली. दरम्यान रात्री उशीरापर्यंत रस्त्याच्या मधे असलेली बस बाजूला काढण्याचे प्रयत्न सुरू होते. 

अपघाताबद्दल माहिती मिळताच पनवेल अग्निशमन दल मदतीसाठी दाखल झाले. अपघात झालेल्या बसमध्ये ३५ हून अधिक प्रवासी प्रवास करीत होते. रात्री उशीरापर्यंत त्यांना रेस्क्यू करण्याचं काम सुरू होते. यातील काही प्रवाशांना एमजीएम रुग्णालय कळंबोली येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. 

Melghat Jungle Safari : मेळघाट जंगल सफारीचा प्लान करताय? आधी ही बातमी वाचा!

नक्की वाचा - Melghat Jungle Safari : मेळघाट जंगल सफारीचा प्लान करताय? आधी ही बातमी वाचा!

ही बस ही मुंबईतून कोकणाकडे जात असताना हा अपघात झाला. रात्री उशीरा अपघातग्रस्त बस बाजुला करण्यात आली. यानंतर वाहतूक सुरळीत झाल्याची माहिती आहे. दरम्यान अपघाताचं नेमकं कारण कळू शकलेलं नाही. मात्र सुदैवाने या अपघातात  मोठी जीवितहानी टळली आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: