जाहिरात

Mumbai Local Train Update: पावसामुळे मुंबईची लाईफलाईन विस्कळीत! लोकल सेवेची सद्यस्थिती काय? वाचा...

Mumbai Rain Local Train Delayed Live Update: या पावसामुळे शहरातील लोकल सेवेवर मोठा परिणाम झाला असून तिन्ही मार्गांवर गाड्या उशिरा येत असल्याने चाकरमान्यांची गैरसोय होत आहे. 

Mumbai Local Train Update: पावसामुळे मुंबईची लाईफलाईन विस्कळीत! लोकल सेवेची सद्यस्थिती काय? वाचा...

Mumbai Rain Local Train Delayed News: मुंबई शहर तसेच उपनगरात कालपासून सुरु असलेल्या पावसामुळे लोकल सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणारी लोकल सेवेचा पावसामुळे मोठा खोळंबा झाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार, आजही मुंबईत जोरदार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे तिनही मार्गांवरील लोकल उशिरा धावत आहेत. 

मुंबईच्या मध्य रेल्वे मार्गावरील घाटकोपर, दादर परिसरातील अनेक  ठिकाणी रेल्वे रुळांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. माटुंगा रेल्वे स्थानकातील रुळही पाण्याखाली गेला आहे. या पावसामुळे शहरातील लोकल सेवेवर मोठा परिणाम झाला असून तिन्ही मार्गांवर गाड्या उशिरा येत असल्याने चाकरमान्यांची गैरसोय होत आहे. 

Mumbai Rain LIVE: मुंबईतील पावसाचा लोकल सेवेला फटका, रुळांवर पाणी साचल्याने ट्रेन उशिरा

कोणत्या मार्गावरील लोकल किती मिनिटे उशिरा?

सध्या मध्य रेल्वे (Central Railway) ३० ते ४० मिनिटे उशिरा, पश्चिम रेल्वे (Western Railway) १५ ते २० मिनिटे उशिरा धावत आहे. त्याचबरोबर हार्बर (Harbour Line)  मार्गावरीलही गाड्या 25 ते 30 तसेच ट्रान्स हार्बर रेल्वे- 20 ते 25 मिनिटं उशिरा धावत असल्याची माहिती मिळत आहे. कल्याण डोंबिवलीत सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे लोकल गाड्या उशिराने धावत आहेत. सध्या लोकल गाड्या  दहा ते पंधरा मिनिटं उशिराने धावत असल्याची रेल्वे प्रशासनाची माहिती आहे. 

वसई विरारमध्येही अनेक सखल भागामध्ये पाणी साचले असून जनजिवन विस्कळीत झाले आहे. नालासोपाराअचोले रोड नालासोपारा वसई लिंक रोड, डॉन लेन, स्टेशनं परिसरात पाणी भरले, तर विरार पश्चिम भागातील रस्ते पाण्याखाली.. अतिवृष्टी च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच खासगी आणि अनुदानित शाळांना शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. 

School Holiday List: पावसाचे तुफान! 'या' जिल्ह्यातील शाळांना सुट्टी, अकरावी प्रवेशाबाबतही मोठा निर्णय

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com