
Mumbai Crime : दुसऱ्या मुलीने काळी जादू केल्याचं सांगत मुंबईतील एका ज्योतिष-तांत्रिकाने तरुणीची तब्बल 3.47 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. आपला प्रियकर आपल्यापासून दूर जात असल्याने तरुणी टेन्शनमध्ये होती. यासाठी 32 वर्षीय तरुणीने एका तांत्रिकाची मदत घेतली. इन्स्टाग्रामवर भेटलेल्या या तांत्रिकाने तक्रारदार महिलेच्या प्रियकरावर जादूटोणा केल्याचा दावा करत तिला विविध विधींसाठी 3.47 लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला ऑक्टोबर 2024 मध्ये तिच्या प्रियकराला भेटली होती. तिचा प्रियकर मूळचा उत्तर प्रदेशचा असून सध्या ठाण्यात राहतो. तिच्या प्रियकर तिला दुर्लक्ष करीत होता. तिचे फोन उचलत नव्हता. त्यामुळे प्रियकराचं दुसऱ्या तरुणीवर जीव जडल्याचा पीडितेला संशय आला. यामुळे ती टेन्शनमध्ये होती. एकदा इन्स्टाग्राम पाहत असताना तिने एका तांत्रिक-ज्योतिषाची पोस्ट दिसली. साधारण जानेवारी महिन्यात हा प्रकार घडला. या पोस्टमध्ये ज्योतिषी केवळ 251 रुपये घेऊन वैयक्तिक आयुष्य, नातेसंबंध आणि करिअरबद्दल माहिती देण्याचा दावा केला होता.
नक्की वाचा - Akola News : 'मृत्यूनंतर पत्नीला माझा चेहरा दाखवू नका', व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवत तलाठ्याने संपवलं जीवन
पीडितेने या तांत्रिक-ज्योतिषाची संपर्क केला. सुरुवातील तिने 251 रुपये भरले. सर्व माहिती दिली. यावेळी तांत्रिक-ज्योतिषाने अजबच दावा केला. तुझ्या प्रियकरावर दुसऱ्या एका तरुणीने काळी जादू केली आहे. त्याचं तुझ्यावर प्रेम आहे. मात्र या जादूमुळे तो तुझ्यापासून दूर जात असल्याचं तांत्रिकाने सांगितलं. हे दूर करण्यासाठी तांत्रिक-ज्योतिषाने महिलेकडून 53 व्यवहारातून 3 लाख 47 हजारांपर्यंत फसवणूक केली. कालांतराने तांत्रिक आपली फसवणूक करत असल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world