Pod Taxi Ticket On Mumbai One Card: मुंबईकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईकरांचा प्रवास जलद आणि सुखकर होण्यासाठी 'पॉड टॅक्सी' प्रकल्प लवकरच सुरू होणार आहे. आणि या प्रकल्पाला आता नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) अर्थात 'मुंबई वन कार्ड' सोबत जोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. याचा थेट फायदा दररोज प्रवास करणाऱ्या लाखो मुंबईकरांना होणार आहे. भविष्यात पॉड टॅक्सीतून प्रवास करताना तिकीट काढण्यासाठी वेगळी रांग लावण्याची गरज नाही, कारण 'मुंबई वन कार्ड'वरच हे तिकीट उपलब्ध होणार आहे.
पॉड टॅक्सीचे तिकीट आता मुंबई वन कार्डवर..
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) शहर आणि उपनगरातील प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी वेळ वाचवता यावा, तसेच वेगवेगळ्या वाहतूक साधनांसाठी वेगवेगळी तिकीटं घेण्याचा त्रास कमी व्हावा यासाठी 'मुंबई वन कार्ड' आणि संबंधित अॅपची सुरुवात केली होती. सध्या हे कार्ड मेट्रो रेल्वे, बेस्ट (BEST) च्या बसेस आणि मुंबई लोकलच्या तिकीट खरेदीसाठी वापरले जाते. आता, या बहुउद्देशीय कार्डच्या सेवेत पॉड टॅक्सीची भर पडणार आहे.
Kalyan News : 'KDMC अधिकाऱ्याला ऑफिसमध्ये घुसून मारणार!' खासदाराचा थेट इशारा, पाहा Video
सध्या पॉड टॅक्सी प्रकल्पाचा पहिला टप्पा बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) ते कुर्ला दरम्यान सुरू करण्याची तयारी वेगाने सुरू आहे. नुकत्याच झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत, हा प्रकल्प जेव्हा प्रत्यक्षात सुरू होईल, तेव्हा त्याचे तिकीट काढण्यासाठी 'मुंबई वन कार्ड'चा वापर बंधनकारक असेल, असा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईकर प्रवासी सध्या मेट्रो किंवा बेस्ट बसमध्ये जसे फक्त कार्ड टॅप करून किंवा अॅपचा वापर करून लगेच तिकीट काढतात, त्याचप्रमाणे भविष्यात पॉड टॅक्सीसाठीही हीच पद्धत वापरता येईल.
मुंबईत पॉड टॅक्सीचे जाळे...
महामुंबईत पॉड टॅक्सीचे जाळे उभारण्यासाठीचे सर्वेक्षण सध्या प्रगतीपथावर आहे. विशेषत: बीकेसी-कुर्ला दरम्यानच्या प्रकल्पासाठी डेपोच्या जागाही निश्चित करण्यात आल्या आहेत. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प २६० खांबांवर उभारला जाणार आहे. एकदा हा प्रकल्प सुरू झाला की, मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाला एक नवा आणि वेगवान पर्याय उपलब्ध होईल. मुंबई वन कार्डमुळे लोकल, मेट्रो, बस आणि आता पॉड टॅक्सी अशा चार महत्त्वाच्या वाहतूक साधनांसाठी एकच कार्ड वापरण्याची सोय मिळणार असल्याने मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत एक मोठी क्रांती होणार आहे.
( नक्की वाचा : Triple Murder नीलगाय नव्हे, कुटुंब पुरले! वन अधिकाऱ्याने कशी आणि का केली पत्नी-मुलांची हत्या, वाचा थरारक कहाणी )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world