
Jain Community Announced New Party: जैन समाजाकडून कबुतरखाने अन्नावाचून मृत्यू पावलेल्या कबुतरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी धर्मसभेचे आयोजन करण्यात आले आहे. दादरमध्ये पार पडलेल्या या सभेमध्ये जैन मुनींकडून आक्रमक भूमिका मांडत नव्या पक्षाची घोषणा करण्यात आली आहे. यापुढे आमचेच आमदार, आमचेच खासदार असतील असे म्हणत आगामी महापालिका निवडणुका लढणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
काय म्हणालेत जैन मुनी?
"शांती दूत जनकल्याण पार्टीची आता मी घोषणा करतोय, आमचेच आमदार असतील आमचेच खासदार असतील. कबूतर आता निर्णय घेणार. कोण सत्तेवर बसणार? कोण गाडीवर बसणार? राजस्थानच्या सर्व कोम या पार्टीत असतील, फक्त चादर आणि फादर सोडून सगळे या पार्टीत असतील, अशी महत्त्वाची घोषणा जैन मुनींनी केली आहे. कबुतरांची पार्टी पाहिजे, शिवसेनेत ही वाघ होता, आमच्या पार्टीचा चिन्ह कबूतर असेल. ही फक्त जैनांची पार्टी नाही, ही गुजराती मारवाडीची पार्टी, आम्ही महापालिकेत आमचे उमेदवार उभे करू' असे जैन मुनी कैवल्य रत्न महाराज यांनी सांगितले आहे.
तसेच "आता आम्ही अल्टिमेटम देतोय दिवाळीपर्यंत जर निर्णय नाही आला तर आम्ही उपोषण करणार, आता ही लढाई फक्त कबुतरांची नाही तर गो मातेसाठी देखील असेल. सरकारला माझा नाही, सनातन धर्माचा इशारा आहे. राजकारणासाठी कबूतर आणायचे नाही. मंगलप्रभात लोढा हा जैन समाजाचाच नाही तर मुंबईचा नेता, ही सभा त्यांची नव्हती, त्यांच्याबाबत काही बोलायचं नाही," असेही जैन मुनी यावेळी म्हणालेत.
Mahapalika Election: महाविकास आघाडीत बिघाडी? मित्रपक्षांची वाट न पाहता काँग्रेस एक पाऊल पुढे
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world