Mumbai Solapur Vande Bharat Update: मुंबई-सोलापूर वंदे भारत आणखी एका स्टेशनवर थांबणार

Mumbai Solapur Vande Bharat Update: मुंबई ते सोलापूर वंदे भारत ट्रेन  ही CSMT स्थानकातून संध्याकाळी 16:05 वाजता सुटते. दादर, ठाणे, कल्याण इथे या गाडीला थांबा असून ती संध्याकाळी 7.10 वाजता पुणे येथे पोहोचते.

जाहिरात
Read Time: 3 mins
सोलापूर:

सौरभ वाघमारे

Mumbai Solapur Vande Bharat Update: भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या रेल्वे बोर्डाने प्रवाशांच्या सोयीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रेल्वे बोर्डाने जारी केलेल्या आदेशानुसार, दोन महत्त्वाच्या वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना प्रायोगिक तत्त्वावर नवीन स्थानकांवर थांबा देण्याची मंजुरी दिली आहे. रेल्वे मंडळाचे संयुक्त संचालक विवेक कुमार सिन्हा यांच्या सहीनिशी या संदर्भातील निर्णय जारी करण्यात आला आहे.  30 सप्टेंबर रोजी हा निर्णय घेण्यात आला असून त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी असेही आदेशात नमूद करण्यात आले होते.  

नक्की वाचा: पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प अडचणीत! 4285 कोटींच्या प्रकल्पाला ब्रेक लागणार? काय आहे कारण?

कोणत्या वंदे भारत एक्सप्रेसला कोणत्या स्थानकावर थांबा मिळणार?

मध्य रेल्वेने घेतलेल्या या निर्णयानुसार, हुबळी-पुणे वंदे भारत एक्सप्रेस (ट्रेन क्रमांक 20669/20670) हिला किर्लोस्करवाडी येथे थांबा देण्यात येणार आहे. तर, CSMT-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस (ट्रेन क्रमांक 22225/22226) या ट्रेनला दौंड येथे थांबा देण्यासंदर्भातील आदेश देण्यात आला आहे.  या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले असून लवकरच या ट्रेन नव्या थांब्यावरही थांबतील असे सांगण्यात आले आहे.  प्रायोगिक तत्वावर हा बदल करण्यात येत असून त्याला यश मिळालं तर तो कायमस्वरुपी केला जाईल अशी अपेक्षा वर्तवण्यात येत आहे.

CSMT- Solapur वंदे भारत कोणकोणत्या स्थानकांवर थांबते? (CSMT- Solapur Vande Bharat Train No. 22225 Route, Station, Timing)

मुंबई ते सोलापूर वंदे भारत ट्रेन  ही CSMT स्थानकातून संध्याकाळी 16:05 वाजता सुटते. दादर, ठाणे, कल्याण इथे या गाडीला थांबा असून ती संध्याकाळी 7.10 वाजता पुणे येथे पोहोचते. पुण्यात 5 मिनिटांचा थांबा घेऊन ही गाडी रात्री 10:40 वाजता सोलापूरला पोहोचते.

CSMT- Solapur वंदे भारत, ट्रेन क्र. 22225 या स्थानकांवर थांबते (CSMT- Solapur Vande Bharat Train No. 22225 Time Table)

CSMT वरून ही ट्रेन संध्याकाळी 4 वाजून 5 मिनिटांनी सुटते. त्यानंतर ती खालील स्थानकांवर  थांबते ते पाहा.  
दादर -संध्याकाळी 4.15 वाजता पोहोचते
ठाणे -संध्याकाळी 4.33 वाजता पोहोचते
कल्याण जं. -संध्याकाळी 4.51 वाजता पोहोचते
पुणे जं. -संध्याकाळी 7.10 वाजता पोहोचते
कुर्डुवाडी- रात्री 9.28 ला पोहोचते
सोलापूर- 10:40 वाजता पोहोचते 

Advertisement

नक्की वाचा: कार्तिकी वारीसाठी 1150 ज्यादा एसटी बसेस, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

Solapur-CSMT  वंदे भारत कोणकोणत्या स्थानकांवर थांबते?  (Solapur-CSMT Vande Bharat Train No. 22226 Route, Station, Timing)

Solapur-CSMT  वंदे भारत ट्रेन सोलापूरहून सकाळी 6 वाजून 5 मिनिटांनी सुटते. ही ट्रेन कुर्डुवाडी, पुणे, कल्याण, ठाणे आणि दादर या स्थानकांवर थांबते आणि दुपारी 12 वाजून 35 मिनिटांनी मुंबई (CSMT) येथे पोहोचते.

Solapur-CSMT  वंदे भारत, ट्रेन क्र. 22226 या स्थानकांवर थांबते (Solapur-CSMT Vande Bharat Train No. 22226 Time Table)

सोलापूरहून Solapur-CSMT  वंदे भारत ट्रेन सकाळी 6.05 ला निघते
कुर्डूवाडी- सकाळी 6.53 ला पोहोचते
पुणे-सकाळी 9.15 ला पोहोचते
कल्याण-  सकाळी 11.33 ला पोहोचते
ठाणे- सकाळी 11.50 ला पोहोचते
दादर- दुपारी 12.12 ला पोहोचते
CSMT- दुपारी 12.35 ला पोहोचते
 

Advertisement
Topics mentioned in this article