संकेत कुलकर्णी, पंढरपूर
Kartiki Ekadashi 2025: आषाढी एकादशीनंतर पंढरपुरात होणाऱ्या कार्तिक वारीला मोठे महत्त्व आहे. यावर्षी 2 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीचा सोहळा होत असून, यासाठी जवळपास 8 ते 9 लाख भाविक पंढरपुरात उपस्थित राहण्याची शक्यता आहे. भाविकांची ही प्रचंड गर्दी लक्षात घेऊन, राज्य परिवहन महामंडळाने यंदाच्या यात्रेसाठी विशेष व्यवस्था केली आहे.
1150 जादा बसेसची सोय
राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्वतः पंढरपूरला भेट देऊन एसटी बसेसच्या व्यवस्थेचा आढावा घेतला. त्यांनी अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनेनुसार, यावर्षी कार्तिकी यात्रेसाठी 1150 हून अधिक जादा एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे राज्यातील लाखो भाविकांचा प्रवास सुलभ होणार आहे.
(नक्की वाचा- Ratnagiri Accident: हृदयद्रावक! खड्ड्यात बस आपटली अन् Emergency दरवाजा उघडला, पुढे भयंकर घडलं)
राज्यातील सर्व आगारातून धावणार नव्या कोऱ्या 'लाल परी'
प्रवाशांसाठी सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे, यंदा राज्यातील मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ अशा सर्वच भागातून पंढरपूरकडे धावणाऱ्या बसेस बहुतांशी नव्या कोऱ्या 'लाल परी' असतील. परिवहन मंत्री सरनाईक यांनी अधिकाऱ्यांसोबत आढावा घेताना, इलेक्ट्रिक बससह नव्या बसेस पंढरपूरला सोडण्यात याव्यात, अशा स्पष्ट सूचना दिल्या. यामुळे पंढरपूरची कार्तिकी वारी यंदा राज्यातील भाविकांसाठी अधिक सुखकर होणार आहे.
(नक्की वाचा- Ulhasnagar News: तडीपार करण-अर्जुनचा हैदोस! पत्रकारावर जीवघेणा हल्ला, कारणही आले समोर)
बस स्थानकाची विशेष तयारी
कार्तिकी वारीच्या सोहळ्यासाठी एसटी महामंडळाकडून पंढरपूरमध्ये भाविकांच्या सोयीसाठी भव्य 'चंद्रभागा बस स्थानक' देखील निर्माण करण्यात आले आहे. या स्थानकामुळे मोठ्या संख्येने येणाऱ्या बसेसचे व्यवस्थापन आणि भाविकांचे दळणवळण सुव्यवस्थित होईल. एकादशीचा सोहळा संपल्यानंतरही भाविकांना परत जाण्यासाठी या मार्गावर पुरेसा एसटी बसचा पुरवठा ठेवण्यात येणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world