
राज्यातील बेरोजगारीचा प्रश्न दिवसेंदिवस भीषण स्वरुप धारण करीत आहे. याचं भयानक उदाहरण म्हणजे नागपूर महानगरपालिकेची नोकर भरती. सर्वसाधारणपणे उच्च शिक्षण चांगल्या पदाची आणि चांगल्या पगाराची नोकरी मिळावी यासाठी घेतलं जातं. मात्र उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मात्र मिळत नाही आणि ज्या नोकऱ्या उपलब्ध आहेत, त्यासाठीच्या उमेदवारांची क्षमता अधिक आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नागपूर महानगरपालिकेतील 90 दिवसांच्या डास तपासणी पदासाठी दहावी उत्तीर्ण उमेदवारांची आवश्यकता असते. मात्र या पदासाठी पदवीधर, पदव्युत्तर उमेदवारांनी अप्लाय केल्याचं समोर आलं आहे.
नक्की वाचा - Nagpur Crime : बारमध्ये दारूचे पेग रिचवताना हातातून ग्लास फुटला; नागपुरात हत्येचा विचित्र प्रकार
NMC आरोग्य विभागाने नुकतीच तीन पदांसाठी जाहिरात काढली होती. पावसाळ्यात उद्भवणारे डेंग्यू, चिकनगुनिया यांसारख्या आजारांना रोखण्यासाठी शहरांमध्ये फिरणाऱ्या तरुणांची आवश्यकता होती. डासांची पैदास रोखण्यासाठी अशा ठिकाणांची तपासणी करतात. या पदासाठी 11,250 रुपये इतकं कमी मासिक मानधन दिलं जात आहे. शारीरिकदृष्ट्या कठीण स्वरुपाचं काम असतानाही नागपूर महापालिकेकडे 262 अर्ज आले आहेत. विशेष म्हणजे ही मंडळी नोकरीसाठी तडतोड करायलाही तयार आहेत. या घटनेवर महानगरपालिकेचे अधिकारी म्हणाले, सध्या बेरोजगारी हा प्रश्न आ वासून उभा आहे. डास तपासणीसाठी आलेल्या अर्जांपैकी उरलेल्या 162 उमेदवारांपैकी 40 जण पदवीधर किंवा पदव्युत्तर आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world