
संजय तिवारी, नागपूर: अवैध चिकन मटन मार्केटला छुपा पाठिंबा देणाऱ्या मनपा अधिकाऱ्यांंविरोधात मनसेने केलेल्या अभिनव आंदोलनाची सध्या जोरदार चर्चा होत आहे. नागपूरमध्ये चिकन मटन मार्केटला छुपा पाठिंबा देणाऱ्या मनपा अधिकाऱ्यांंना मनसैनिकांनी चक्क कोंबड्या भेट दिल्या. तसेच अवैध चिकन मटण विक्री केंद्रे बंद झाली नाहीत तर आम्ही महानगरपालिकेच्या कार्यालयात येऊन मटण चिकन विक्री करू असा इशाराही दिला आहे.
नागपूरमध्ये अवैध चिकन- मटन मार्केटला मनपा अधिकाऱ्यांचाच छुपा पाठिंबा असल्याचा आरोप मनसेने केला आहे. याचाच निषेध म्हणून मनसे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी आणि नागपूर उप-शहर अध्यक्ष तुषार गिऱ्हे यांनी या अधिकाऱ्यांना चक्क कोंबड्या भेट दिल्या. वारंवार निवेदन देऊनही अधिकाऱ्यांना नागरिकांच्या भावना कळत नाहीत, असे म्हणत यावेळी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
भाजपच्या माजी नगरसेवकाची गुंडगिरी, क्षुल्लक कारणावरून पिस्तुल रोखत शिक्षकाला जीवे मारण्याची धमकी
अवैध चिकन मटन मार्केटच्या लोकांशी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे काही लागेबांधे असतील तर आजपासून एक आठवड्याचा अल्टिमेटम देतो. जर अवैध मार्केट हटविले नाही तर ऑफिसमध्ये येऊन आम्ही चिकन विक्री करू असा निवेदनाद्वारे इशारा देण्यात आला आहे. मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी व शहर उपाध्यक्ष तुषार गिऱ्हे आदी नेते यावेळी उपस्थित होते.
गेल्या अनेक वर्षांपासून खामला सोनेगाव मार्गावरील जयप्रकाश नगर व सहकार नगरच्या प्रारंभी अवैध चिकन व मटन मार्केट मनपाच्या आशीर्वादाने सुरू आहे. हे मार्केट फुटपाथवर असून या अवैध दुकानांसमोर बेवारस कुत्र्यांची फौज उभी असते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी सोबतच अपघातही होतात. काही वेळा भीषण अपघात होऊन लोकांना अपंगत्व आले, तरीही मनपा च्या लक्ष्मी नगर झोन ने या गंभीर विषयावर दुर्लक्ष केले, अशी तक्रारही मनसेने केली आहे.
Madhuri Elephant: माधुरीसाठी अदृश्य मोर्चा निघणार, नियमही ठरले
दरम्यान, याबाबत आज मनसेच्या शिष्टमंडळाने पुरावे सादर करून सहाय्यक आयुक्त श्री चौधरी व निरीक्षक केळझरकर यांना निवेदन व विस्तृत माहिती दिली, त्यासोबतच हे चिकन व मटन विक्रेते कोण आहेत ? कुठल्या भागातील नागरिक आहेत ? याची माहिती मनपाकडे उपलब्ध आहे का? असा सवालही केला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world