जाहिरात

Nashik News : भाजपच्या माजी नगरसेवकाची गुंडगिरी, क्षुल्लक कारणावरून पिस्तुल रोखत शिक्षकाला जीवे मारण्याची धमकी

नाशिकमध्ये भाजपच्या एका माजी नगरसेवकाने किरकोळ कारणातून प्राध्यापकाला बंदुकीचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Nashik News : भाजपच्या माजी नगरसेवकाची गुंडगिरी, क्षुल्लक कारणावरून पिस्तुल रोखत शिक्षकाला जीवे मारण्याची धमकी

Nashik Crime News : नाशिकमध्ये भाजपच्या एका माजी नगरसेवकाने किरकोळ कारणातून प्राध्यापकाला बंदुकीचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिक शहरातील पाथर्डी फाटा परिसरात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर भाजपचे माजी नगरसेवक यशवंत निकुळे यांच्यावर मात्र अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर मात्र सर्वसामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.

नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील मुख्य रस्त्यावरून विरुद्ध बाजूने जाणाऱ्या माजी नगरसेवक संशयित यशवंत निकुळे यांनी मंगळवारी त्यांच्या ताब्यातील कार चालवून समोरून येणाऱ्या दुचाकीला कट दिला आणि यामुळे दुचाकीचालक शिक्षकाने त्यांना 'हा काय प्रकार आहे गाडी चालवायचा...? असा जाब विचारला यामुळे परिसरात प्रतिष्ठा असल्याने आणि गृहमंत्र्यांच्या पक्षाचाच (BJP leader threatens to kill teacher) माझी नगरसेवक असल्याने या माजी नगरसेवकाचा पारा चढला आणि शिवीगाळ करत थेट कारच्या डॅशबोर्डमधून पिस्तूल काढत सर्वसामान्य शिक्षकावर रोखून जीवे  मारण्याची धमकी दिली.

Navi Mumbai: डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे 5 रुग्णांनी गमावली दृष्टी; बाप लेकाविरोधात गुन्हा दाखल

नक्की वाचा - Navi Mumbai: डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे 5 रुग्णांनी गमावली दृष्टी; बाप लेकाविरोधात गुन्हा दाखल

यानंतर घाबरलेल्या दुचाकी चालक शिक्षकाने इंदिरानगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांकडून फक्त अदाखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला. या शिक्षकाकडून सांगण्यात आले की, त्या ठिकाणी जमलेले अनेक राजकीय लोक माझ्यावर दबाव टाकत होते. मी एफ आय आर मागितली तर एनसी दाखल केली असल्याचं सांगण्यात आलं आणि माझ्या तक्रारीवरून गुन्हा दाखल न केल्याचा आरोप या दुचाकी चालक शिक्षक राहुल सिंग यांनी केला आहे. थेट भररस्त्यात पिस्तूल काढून सर्वसामान्य नागरिकांवर रोखणे ही घटना पोलिसांसाठी दखल घेण्यायोग्य नाही का असा सवाल या घटनेनंतर उपस्थित होऊ लागला आहे.  

अनेक ठिकाणी शस्त्र काढले, पिस्तुलीचा धाक दाखवला तर अनेकांची धिंड निघते. पोलीस तातडीने त्यांच्यावर कारवाई करतात, गुन्हे दाखल करतात मात्र सर्वसामान्य शिक्षकांवर गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षातील माजी नगरसेवकाने भर रस्त्यात पिस्तुल रोखल्याने साधा गुन्हाही दाखल न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. माजी नगरसेवकावर करण्यात येत असलेल्या आरोपात कितपत तथ्य आहे ? खरच पिस्तुल रोखण्यात आली का ? याचा इंदिरानगर पोलीस तपास करत असून त्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com