जाहिरात

Nagpur News: नागपूरकरांनी घेतला मोकळा श्वास, 'या' भागातील पट्टेरी वाघाची मोठी अपडेट समोर, शिकार की अन्य काही..

नागपूरच्या दक्षिण उमरेड वनपरिक्षेत्रातील नांद्रा (पश्चिम)नियतक्षेत्रातील मौजा चनोडा शिवारात एका पट्टेदार नर वाघाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.

Nagpur News: नागपूरकरांनी घेतला मोकळा श्वास, 'या' भागातील पट्टेरी वाघाची मोठी अपडेट समोर, शिकार की अन्य काही..
Nagpur Stripped Tiger latest News

Nagpur Tiger News Today : नागपूरच्या दक्षिण उमरेड वनपरिक्षेत्रातील नांद्रा (पश्चिम) नियतक्षेत्रातील मौजा चनोडा शिवारात एका पट्टेदार नर वाघाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वाघाचा मृतदेह वनकक्ष क्रमांक 364 पीएफ लगत असलेल्या नाल्यात आढळून आला.या घटनेबाबत वन अधिकाऱ्यांना तत्काळ कळवण्यात आले.त्यानंतर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडून (NTCA) पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली.तसेच घटनास्थळी सखोल तपासणी करण्यात आली.

मृत वाघाचा मृतदेह वनपरिक्षेत्र कार्यालय परिसरात आणण्यात आला.त्यानंतर NTCA च्या मार्गदर्शक सूचनांनुसार शवविच्छेदन प्रक्रिया पार पडली.या कार्यवाही दरम्यान नागपूर वनवृत्ताचे वनसंरक्षक (प्रादेशिक)जी.गुरुप्रसाद,नागपूर वनविभागाच्या उपवनसंरक्षक डॉ.विनिता व्यास,उमरेडचे सहाय्यक वनसंरक्षक मनोज धनविजय,दक्षिण उमरेडचे वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक आंबटकर यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.

नक्की वाचा >> Pune News : अनंतराव थोपटे यांच्या शोकसभेनंतर बालगंधर्व रंगमंदिरात तणावाचं वातावरण, नाट्यप्रेमींचा झाला हिरमोड

प्राथमिक तपासात थक्क करणारी माहिती उघड

शवविच्छेदन प्रक्रियेसाठी (WRTC) गोरेवाडाचे डॉ.सुजित कोलंगट,पशुवैद्यकीय चिकित्सालय उमरेडचे सहाय्यक आयुक्त डॉ.अश्विनी जगनापे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.पूजा हिवरकर,पशुवैद्यकीय अधिकारी आमगावचे डॉ.सुमन नागपुरे,पशुवैद्यकीय अधिकारी चामोर्शीचे डॉ.योगेश राठोड, सिरसी येथील पशुवैद्यकीय पदवीधर डॉ.पांडे तसेच NTCA चे प्रतिनिधी अनिमेष लांडे आणि प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयाचे प्रतिनिधी रोहित कोरडे उपस्थित होते.याशिवाय क्षेत्र सहाय्यक श्रीमती अनिता उडके,वनरक्षक मनोहर सोडनर आणि इतर कर्मचारीदेखील उपस्थित होते.

नक्की वाचा >> Jalgaon News: शिवसेना UBT नगराध्यक्षांची भाजप कार्यालयाला भेट, 'या' मंत्र्यासोबत बंद दाराआड केली एक तास चर्चा

...तरच वाघाच्या मृत्यूचे कारण होईल स्पष्ट

शवविच्छेदनानंतर नियमानुसार मृत वाघाच्या मृतदेहाचे दहन करण्यात आले.प्राथमिक तपासणीत वाघाचे सर्व अवयव सुरक्षित असल्याचे आढळून आले. कातडी,नखे,सुळे,दात,पाय,शेपूट आणि मिशा यांसह सर्व अवयव पूर्णपणे शाबूत असल्याने प्रथमदर्शनी शिकारीचा कोणताही पुरावा आढळून आलेला नाही.संबंधित वाघ हा नर असून त्याचे वय अंदाजे 5 ते 6 वर्षे असल्याचा अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे.घटनास्थळावरून न्यायवैद्यकीय तपासणीसाठी आवश्यक नमुने संकलित करण्यात आले आहेत.शवविच्छेदन अहवाल आणि प्रयोगशाळेतील तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतरच वाघाच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com