जाहिरात
This Article is From Nov 25, 2024

मोठी बातमी! नाना पटोले महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती आहे.

मोठी बातमी! नाना पटोले महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत
मुंबई:

सागर कुलकर्णी, प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या दारूण पराभवानंतर नाना पटोले दिल्लीला रवाना झाले होते. त्यांनी २४ नोव्हेंबरला काँग्रेसच्या हायकमांडची भेट घेतल्याचं सांगितलं जात होतं. त्यानंतर आज काँग्रेसच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहे. त्यांनी हायकमांडकडे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या हायकमांडने नाना पटोले यांना वेट अँड वॉचच्या भूमिकेत ठेवला आहे.

VIDEO : "थोडक्यात वाचलास, दर्शन घे दर्शन", अजित पवारांचा रोहित पवारांना मिश्किल टोला

नक्की वाचा - VIDEO : "थोडक्यात वाचलास, दर्शन घे दर्शन", अजित पवारांचा रोहित पवारांना मिश्किल टोला

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा पराभवाचा सामना करावा लागला. या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. या निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर, बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे यांचा पराभव झालेला आहे. यासर्वाची नैतिक जबाबदारी स्वीकारत नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com