जाहिरात
This Article is From Apr 26, 2024

'मैत्री जपली त्यासाठी धन्यवाद, पण माझं मतदान तुम्हाला नाही'; गणपत कदम यांनी स्पष्टच केलं

सध्या भाजपचे सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघाचे उमेदवार नारायण राणे आणि उद्धव ठाकरे गटातील माजी आमदार गणपत कदम यांच्या भेटीची चर्चा सुरू आहे.   

'मैत्री जपली त्यासाठी धन्यवाद, पण माझं मतदान तुम्हाला नाही'; गणपत कदम यांनी स्पष्टच केलं
रत्नागिरी:

राजकारणात मतभेद असावे परंतू 'मनभेद' असू नये असं म्हणतात. कितीही वैचारिक मतभेद असले तरी जेव्हा एखाद्यावर कठीण प्रसंग ओढवतो तेव्हा विरोधी पक्षातील लोकही एकत्र यावेत अशीच अपेक्षा असते. सध्या भाजपचे सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघाचे उमेदवार नारायण राणे आणि उद्धव ठाकरे गटातील माजी आमदार गणपत कदम यांच्या भेटीची चर्चा सुरू आहे.   

महायुतीचे उमेदवार नारायण राणे दोन दिवसांपूर्वी गणपत कदम यांची भेट घेतली होती. त्यामुळे चर्चांना उधाण आलं होतं. या भेटीबाबत बोलताना गणपत कदम म्हणाले की, निवडणुकीत मतदान करून उपकाराची परतफेड . करणं हे माझ्या तत्वात बसत नाही. कारण मी जिथे आहे तिथे कायम आहे. त्यामुळे परतफेड वगैरे दुसऱ्या मार्गाने होऊ शकेल. पण मी तुम्हाला मतदान करणं किंवा आणखी कोणाचा प्रचार करणं मला शक्य होणार नाही. राणे साहेबांना मत देईल, हे कधीही माझ्या तोंडातून आलेलं नाही आणि येणारही नाही, अशा शब्दात गणपत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

माझ्यावर मेहरबानी करा, माझ्या घरी येऊ नका असं मी दादांचा फोन आल्यावर त्यांना सांगितल्याचं कदम म्हणाले. पण तुमच्या गाडीला अपघात झाला हे मला समजलं त्यामुळे तुमच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी एक जुना सहकारी, मित्र म्हणून मी येत आहे, तुमची काही हरकत आहे का, असा प्रश्न नारायण राणे यांच्याकडून विचारण्यात आल्याची माहिती कदम यांनी दिली. मग माझाही नाईलाज झाला असं एकेकाळचे नारायण राणे यांचे सहकारी आणि सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात असलेले राजापूरचे माजी आमदार गणपत कदम यांनी स्पष्ट केलं आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा )

काय म्हणाले कदम?
मैत्री जपलीत त्याबद्दल धन्यवाद, पण मी माझं मतदान तुम्हाला देणार नाही हे माझं वाक्य होतं. पण दादा तुम्ही उभे राहा मी तुमच्या पाठीशी आहे असं चित्र मीडियाने रंगवलं. त्यामुळे दुःख झालं. खासदार साहेबांच्या 4 प्रचार सभांना मी होतो. जर मला यांच्या सोबत जायचंच असतं तर मी या सभांना हजेरीच लावली नसती, असं गणपत कदम यांनी स्पष्ठ केलं. गणपत कदम आणि राणे यांच्याच भेटीची चर्चा झाली, बाकी कोणाला भेटले त्याची चर्चा नाही झाली. राणे यांनी सिंधुदुर्गचा विकास केलेला आहे. आता त्यांना संधी मिळाली तर रत्नागिरीचाही विकास करतील असं मी म्हटलं आहे. पण मी आमचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचाराला आलो आहे. राणे यांना तिकीट नंतर मिळालं. एवढं करूनही चित्र वेगळं रंगवलं जात असल्याची खंत गणपत कदम यांनी व्यक्त केली.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com