जाहिरात

Narayan Rane : 'मी खून करणार होतो'! राणेंच्या 'त्या' कबुलीनं भर कार्यक्रमात सन्नाटा; नेमकं काय घडलं होतं?

Narayan Rane Shocking Revelation:  भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी कणकवली येथील एका कार्यक्रमात केलेल्या धक्कादायक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Narayan Rane : 'मी खून करणार होतो'! राणेंच्या 'त्या' कबुलीनं भर कार्यक्रमात सन्नाटा; नेमकं काय घडलं होतं?
Narayan Rane : नारायण राणे यांनी एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे.
मुंबई:

Narayan Rane Shocking Revelation:  भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी कणकवली येथील एका कार्यक्रमात केलेल्या धक्कादायक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. बाळासाहेब ठाकरेंबद्दलचे जुने किस्से सांगताना राणे यांनी थेट खुनाबद्दल भाष्य केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 

मी एका उपशाखाप्रमुखाला ठार मारणार होतो, असे खळबळजनक विधान त्यांनी भर कार्यक्रमात केले. नारायण राणे यांच्या या विधानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

बाळासाहेबांचा किस्सा आणि राणेंची कबुली

कणकवलीतील एका कार्यक्रमात बोलताना नारायण राणे यांनी शिवसेनेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. शिवसेनेत असतानाचे कट्टरपण सांगताना त्यांनी हा प्रसंग सांगितला. मी एका उपशाखाप्रमुखाचा खून करणार होतो, असे राणे यांनी सांगताच सभेत एकच शांतता पसरली.

 राणे यांच्या या आक्रमक विधानावर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया देताना, त्या काळचे शिवसैनिक असेच कट्टर असायचे, असे म्हणत राणेंची पाठराखण केली आहे. मात्र, एकेकाळी राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या नेत्याने असे विधान केल्याने चर्चेला उधाण आले आहे.

( नक्की वाचा : Sindhudurg News : घरांना कुलुप,मुक्या जनावरांसह अख्खं गाव 5 दिवस रानात ! वाचा काय आहे 450 वर्षांची परंपरा )

राणेंचा वादग्रस्त राजकीय इतिहास

नारायण राणे यांचा राजकीय प्रवास नेहमीच संघर्षाचा आणि वादांचा राहिला आहे. 1991 मध्ये सिंधुदुर्गातील काँग्रेस नेते श्रीधर नाईक यांच्या हत्येप्रकरणी राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता, मात्र 1997 मध्ये त्यांची यातून निर्दोष मुक्तता झाली होती. त्यानंतर 2002 मध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सत्यविजय भिसे यांची हत्या झाली, तेव्हा राणे विरोधी पक्षनेते होते. 

या घटनेनंतर राणे यांच्या कणकवलीतील घराची जाळपोळ झाली होती. त्यावेळी शिवसेनेचा कोणताही मोठा नेता आपल्या मदतीला आला नाही, ही सल आजही राणेंच्या मनात असल्याचे बोलले जाते आणि येथूनच ते शिवसेनेपासून दुरावल्याचे मानले जाते.

शिवसेना ते भाजपा व्हाया काँग्रेस

शिवसेनेत असताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्रीपद, महसूलमंत्री आणि विरोधी पक्षनेते अशी महत्त्वाची पदे भूषवली. हे सर्व वैभव आपल्याला बाळासाहेबांमुळेच मिळाल्याचे ते आजही अभिमानाने सांगतात. मात्र, 2004 मध्ये त्यांनी शिवसेनेत पदांचा बाजार चालतो असा आरोप केला आणि 2005 मध्ये ते पक्षाबाहेर पडले.

त्यानंतर काँग्रेस आणि स्वतःचा स्वाभिमान पक्ष असा प्रवास करत ते भाजपमध्ये स्थिरावले. भाजपमध्ये आल्यावर त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर सातत्याने कडाडून टीका केली आहे. विशेषतः दिशा सालियन प्रकरणात त्यांनी आदित्य ठाकरेंवर केलेले आरोप प्रचंड गाजले होते.

( नक्की वाचा : BMC Election 2026 : मानखुर्दमध्ये राडा; भाजपा नेत्यांनी रात्री बोलावलं आणि...अपक्ष उमेदवाराचा सनसनाटी आरोप )

निवृत्तीच्या चर्चा आणि प्रकृतीची चिंता

 नारायण राणे सध्या भाजपाचे खासदार आहेत, तर त्यांचे पुत्र नितेश राणे आणि निलेश राणे राजकारणात सक्रिय आहेत. काही दिवसांपूर्वीच राणे यांनी आता थांबायला हवे म्हणत राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले होते. मात्र, त्यावरून चर्चा सुरू होताच, मी निवृत्ती घेणार असे कोण म्हणाले, असा प्रतिप्रश्न करत त्यांनी यू-टर्न घेतला. शरीर थकते असे म्हणणाऱ्या राणेंना दुसऱ्याच दिवशी चिपळूण येथील एका कार्यक्रमात अचानक चक्कर आली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com