
नाशिकमधील मालेगावात माजी नगरसेवक अजीज लल्लू आणि त्यांच्या मुलावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. बाइकवरून आलेल्या तीन ते चार जणांनी या दोघांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. शनिवारी (1 जून 2024) मध्यरात्रीच्या सुमारास हजार खोली भागातील मदिना चौकामध्ये ही घटना घडली आहे. हल्ल्यामध्ये अजीज लल्लू गंभीर स्वरुपात जखमी झाले आहेत. अजिज लल्लू यांच्या डोक्यासह चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे, इतकेच नव्हे तर त्यांच्या हाताची बोटेही कापण्यात आली आहेत. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रिपोर्ट्सनुसार, कौटुंबिक वादातून हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे.
(नक्की वाचा: मालेगावात माजी महापौरांवर गोळीबार, तणावामुळे परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात)
मागील आठवड्यातच मालेगावचे माजी महापौर अब्दुल मलिक युनूस ईसा (Badul Malik Yunus Isa) यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची घटना ताजी असताना आता अजीज लल्लू यांच्यावर झालेल्या हल्ल्याने मालेगाव शहर हादरले आहे. यामुळे मालेगावामध्ये पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
(नक्की वाचा: केक भरवण्यावरून वाद, मित्रच मित्राला भिडला; भयंकर शेवट)
माजी महापौरावर गोळीबावर
26 मे 2024 रोजी मालेगावाचे माजी महापौर आणि एमआयएम पक्षाचे महानगर अध्यक्ष अब्दुल मलिक युनूस ईसा (Badul Malik Yunus Isa) यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. हल्ल्यामध्ये मलिक गंभीररित्या जखमी झाले होते. मालेगावातील मुंबई - आग्रा राष्ट्रीय महामार्गजवळ माजी महापौर अब्दुल मलिक युनूस ईसा (Badul Malik Yunus Isa) चहा पिण्यासाठी एका हॉटेलमध्ये बसले होते. याचवेळेस बाइकवरून आलेल्या अज्ञातांनी त्यांच्यावर अगदी जवळून तीन वेळा गोळ्या झाडल्या आणि फरार झाले होते. या हल्ल्यात मलिक गंभीर स्वरुपात जखमी झाले होते.
(नक्की वाचा: गर्लफ्रेंड्सच्या हौसेमौजेसाठी प्रेमवीरांचा खटाटोप, उचललं भलतचं पाऊल, पुढे जे झाले ते...)
Salman Khan | सलमान खान हत्या कट, काय आहे पाकिस्तान कनेक्शन
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world