- नासिक में मर्चेंट नेवी कैप्टन से ज्योतिषी बने अशोक खरात के राजनीतिक संबंधों को लेकर बड़ा विवाद खड़ा हो गया है
- महाराष्ट्र महिला आयोग की अध्यक्ष रूपाली चाकणकर ने अशोक खरात और उनकी पत्नी को अपना गुरु माना था
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और उनके पुत्र श्रीकांत शिंदे की अशोक खरात के साथ तस्वीरें सामने आई हैं
Captain Ashok Kharat : कथित मर्चेंट नेव्हीचा कॅप्टन ते ज्योतिषी बनलेले अशोक खरात याचं प्रकरण केवळ गुन्हेगारासंबंधित राहिलेलं नाही तर यातील राजकीय संबंधावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. पोलीस कोठडीत खरात याच्या चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहे. याशिवाय त्यांचे अनेक राजकीय नेत्यांसोबत संबंध असल्याचंही समोर येत आहे.
रुपाली चाकणकरांसोबत 'गुरु' कनेक्शन
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी त्यांचं कुटुंबीय आणि अशोक खरात यांच्या कुटुंबाचे संबंध असून त्या अशोक खरात आणि त्यांच्या पत्नी मानतात असं मान्य केलं आहे. चाकणकर यांनी मीडियाशी बोलताना याबाबत खुलासा केला. यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे राजीनामा पत्र सोपवलं.
एकनाथ शिंदेंशीही जवळीक...
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांचं नावही या प्रकरणात समोर आलं आहे. २०२२ मध्ये शिर्डी दौऱ्यावर असताना त्यांनी सिन्नरला खास भेट दिली होती. येथे अशोक खरात याच्या उपस्थितीत ईशानेश्वर मंदिरात पूजा करण्यात आली होती. सोशल मीडियावर समोर आलेल्या फोटोंमध्ये खरात, शिंदे आणि त्यांचे सुपूत्र खासदार श्रीकांत शिंदे दिसत आहेत. ज्यामुळे दोघांमध्ये जवळीक असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
दीपक केसरकर अम् कनेक्टरची भूमिका...
माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी एकनाथ शिंदे आणि खरात यांच्यात संपर्क करवून दिल्याचं सांगितलं जात आहे. केसरकर यांचे निकटवर्तीय दीपक लोंढे यांनी एसआयटीने चौकशी केली आहे. लोंढे आणि खरात यांच्यात व्यावसायिक संबंध असल्याचा संशय आहे. विशेषत: सिन्नरमध्ये जमिनीची देवाण-घेवाण झाल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे.
अन्य नेत्यांसह फोटो...
गेल्या काही दिवसात अनेक नेत्यांसोबत अशोक खरात यांचे फोटो व्हायरल होत आहेत. यामध्ये जयंत पाटील, निलेश लंके आणि चंद्रकांत पाटील यांसारख्या नेत्यांचा समावेश आहे. यावर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे म्हणाले, कोणासोबत फोटो काढणं कोणताही गुन्हा नाही. कारण सार्वजनिक जीवनात नेते अनेकांची भेट घेत असतात.
अशोक खरात याचा प्रभाव केवळ वैयक्तिक संबंधांपर्यंत सीमित नव्हता, तर त्याचा संबंध सरकारी निर्णयांपर्यंत होता का यावरही सवाल उपस्थित होत आहेत. अशोक खरात याच्याशी संबंधित असल्याचं म्हटलं जाणाऱ्या “श्री शिवनिका संस्थान”ला पाणी वाटप करणारा २०२० सालचा एक सरकारी आदेश समोर आला आहे. ३१ जुलै २०२० रोजी जारी झालेल्या आदेशानुसार, दारना धरणातून ३९ लाख लिटर पाण्याचं वाटप करण्यात आलं. हे पाणी सिन्नरसारख्या दुष्काळग्रस्त भागांना देण्यात आलं. या खुलाशामुळे, शेतकऱ्यांसाठी असलेले पाणी एका खाजगी संस्थेकडे वळवण्यात आले का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बलात्काराचे आरोप असलेल्या भोंदूबाबा अशोक खरातच्या SIT तपासाबाबत Exclusive माहिती NDTV मराठीच्या हाती लागली आहे. १२ अधिकारी खरात याची चौकशी करीत आहेत. संपत्तीबाबत खरातचे जबाब नोंदवले जात असल्याची सूत्रांची माहिती आहे. 30 पेक्षा जास्त ठिकाणी खरात याची संपत्ती आढळून आली आहे.
SIT कडून सध्या कोणत्या मुद्द्यांवर केला जातो आहे तपास?
भोंदूबाबा कॅप्टन खरातने अनेक महिलांचे शोषण केल्याची माहिती असून त्याबाबत सर्व माहिती गोळा करण्याचे काम सुरू
सध्या तीन महिला तक्रार देण्यासाठी पुढे आल्या आहेत, आणखी काही महिला पुढे येण्याच्या शक्यता
नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये कॅप्टन खरातसह त्याच्या संपर्कातील अन्य लोकांच्या विरोधातील लैंगिक अत्याचार, खंडणी आणि ब्लॅकमेलिंगच्या तक्रारींची माहिती घेणे सुरू
कॅप्टन खरातचे कार्यालय, निवासस्थानावरील लॅपटॉप, कम्प्युटर, हार्ड डिस्क आणि सीसीटीव्ही फुटेज तपासणीचे काम सुरू
कॅप्टन अशोक खरात यांच्या मोबाईलमधील सर्व संभाषणाचे सीडीआर काढण्याचे काम सुरू
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world