जाहिरात

Ashok Kharat : अत्याचारी बाबा अशोक खरात अन् 3 IAS अधिकारी; शिर्डीतील 'त्या' बैठकीने खळबळ

नाशिकमधील अत्याचारी बाबा कॅप्टन अशोक खरात याच्या कृत्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे.

Ashok Kharat : अत्याचारी बाबा अशोक खरात अन् 3 IAS अधिकारी; शिर्डीतील 'त्या' बैठकीने खळबळ

सुनील दवंगे, प्रतिनिधी

Shirdi News : नाशिकमधील अत्याचारी बाबा कॅप्टन अशोक खरात याच्या कृत्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. खरातचे अनेक संतापजनक व्हिडिओ समोर आले आहेत. दरम्यान एसआयटीकडून आज खरात याची चौकशी करण्यात येणार आहे. अशोक खरात हा केवळ अघोरी पूजा नव्हे, तर सरकारी तिजोरी आणि नैसर्गिक संसाधनांवरही त्याची पकड होती. खरात याचे सरकारी पातळीवर मोठ्या ओळखी होत्या. इतकच नव्हे तर आयएएस अधिकाऱ्यासोबतही त्याने भेट घेतल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. 

दरम्यान शिर्डीतील एका नामांकित पंचतारांकित हॉटेलमध्ये आरोपी अशोक खरात याने ३ आयएएस अधिकारी याच्या सोबत भेट घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. खरात याच्या अटकेच्या तीन दिवसांपूर्वी ही बैठक झाल्याची विश्वसनीय सुत्रांची माहिती आहे. विनोद नावाच्या व्यक्तीनं ही भेट घडवून आणल्याची माहिती समोर आली आहे. हे तीन आयएएस अधिकारी कोण, यांची नावं काय आहेत, याबाबतही सवाल उपस्थित होत आहेत. शिर्डीतील चार एकरच्या भुखंडावरील गहू कापणीच्या दिवशी ही भेट झाल्याचं सांगितलं जात आहे. आरोपी कॅप्टन खरातचे शिर्डीत मोठे लागे-बांधे असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नक्की वाचा - NCP News: सुनेत्रा पवार चाकणकरांवर नाराज? प्रदेशाध्यक्षपदावरुन हटवण्याच्या हालचाली; बड्या नेत्याचा विरोध?

हार्डवेअरचं भव्य दुकान...

SIT टीमकडून अत्याचारी बाबा अशोक खरातची चौकशी करण्यात येणार आहे. महिलांचं लैंगिक शोषण प्रकरणी अशोक खरातवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. SIT टीमकडून आज पुन्हा खरातची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती आहे. सिन्नर - शिर्डी महामार्गावर भोंदूबाबा खरात कुटुंबीयांचे हार्डवेअरचं भव्य दुकान असल्याचंही समोर आलं आहे. वावी वेस परिसरात असलेले शिवसंकल्प हार्डवेअर दुकान खरातच्या पत्नीच्या नावावर आहे. खरातच्या नावावर कोट्यावधींची बेनामी जमीन तसेच अनेक बांधकाम व्यवसायातही भागीदारी असल्याची चर्चा आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com