Nashik Tapovan Tress Cutting : नाशिकमधील तपोवनात वृक्षतोडीला सुरुवात झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तपोवनातील वृक्षतोडीवर पर्यावरणप्रेमींकडून विरोध केला जात आहे. मात्र त्यांचा विरोध डावलून एसटीपी प्लांटसाठी वृक्षतोड करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, ३०० झाडांची कत्तल करण्यात आली आहे.
२०२७ मध्ये नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. त्यासाठी देशभरातून लाखो साधू, संत नाशिकमध्ये एकवटणार आहेत. या तयारीअंतर्गत तपोवनमध्ये साधुग्राम बांधण्याची योजना आहे. यासाठी १८०० झाडं तोडावी लागणार आहे. याला पर्यावरणप्रेमींचा विरोध आहे. अनेक कलाकारांनीही या वृक्षतोडीला विरोध केला. मात्र सरकारने कोणाच्याही विरोधाला न जुमानता ३०० झाडांची कत्तल केल्याची माहिती आहे.
बातमी अपडेट होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world