
नवी मुंबई (Navi Mumbai News) पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (ANC) रविवारी मोठी कारवाई करत CBD-बेलापूरमधील एका लॉजवर छापा टाकून 15.36 लाख किमतीची हेरॉईन जप्त (Heroin seized in Navi Mumbai) करण्यात आली आहे. या कारवाईत पंजाबमधील दोन इसमांना अटक करण्यात आली असून तीन आरोपी फरार झाले आहेत. या घटनेने नवी मुंबईत पुन्हा एकदा ड्रग्ज नेटवर्कच्या वाढत्या प्रभावावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
5 जुलै 2025 रोजी सायंकाळी 4:50 वाजता गुप्त माहितीवरून अमली पदार्थ विरोधी पथकाने CBD-बेलापूर येथील स्थानिक लॉजमधील एका खोलीवर छापा टाकला. त्यावेळी दोन आरोपी प्रमजीतसिंग महिंदरसिंग (वय 29, कपूरथला, पंजाब), सुखविंदर दारा सिंग (वय 35, तरणतारण, पंजाब) यांना अटक करण्यात आली. यांच्याकडून 15,36,000 किमतीची 38.400 ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आली आहे. हे अमली पदार्थ आरोपींच्या सामानात हुशारीने लपवून ठेवण्यात आले होते. मात्र छाप्यादरम्यान तिघे आरोपी घटनास्थळावरून फरार होण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी मॅनहंट सुरू केलं असून, नजीकच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासली जात आहेत.
नक्की वाचा - 300 जणांची गर्दी, रात्री 1 वा. पंचायत अन् मृत्यूची घोषणा; चेटकीणीच्या संशयातून कुटुंबातील 5 जणांना जिवंत जाळलं
या प्रकरणाबाबत नवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ(ANC) अधिकारी म्हणाले, "ही हेरॉईन कोणाकडून मिळाली? ती कुठे नेण्यात येणार होती? तिचा वापर कोणासाठी होता? या सगळ्याचा तपास सुरू आहे. आम्ही या नेटवर्कच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहोत." नवी मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या दोन्ही आरोपींविरुद्ध NDPS कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे. अटक आरोपींना चौकशीसाठी ताब्यात ठेवण्यात आलं असून, ड्रग्जच्या साखळीचा तपास सुरू आहे.
नवी मुंबईत ड्रग्जचा विळखा?
गेल्या काही महिन्यांत नवी मुंबईत अनेक ठिकाणी अमली पदार्थ जप्तीच्या घटना समोर आल्या आहेत. बेलापूर, तुर्भे, वाशी आणि नेरूळ परिसर हे आता ड्रग्ज पेडलिंगसाठी “हॉटस्पॉट” बनत चालले आहेत, असे पोलीस तपासात उघड झाले आहे. नवी मुंबई शहरातील लॉज, फ्लॅट्स, आणि किरायाचे रूम हे नशेखोरीसाठी वापरले जात असल्याचं निरीक्षण पोलिसांनी नोंदवलं आहे.
नवी मुंबई CBD-बेलापूरसारख्या मध्यवर्ती आणि शांत परिसरात हेरॉईनसारख्या जीवघेण्या ड्रग्जचा व्यवहार होतोय, हे केवळ पोलिस यंत्रणेसाठीच नाही, तर समाजासाठीही धोक्याचे संकेत आहे. अशा कारवायांमुळे तरुणाई आणि विद्यार्थ्यांमध्ये नशेचे जाळं अधिक गडद होत चालले आहे. नवी मुंबईतील नागरिकांनी सजग राहणं आणि पोलिसांना सहकार्य करणं, हाच या ड्रग्ज विरोधी लढ्याचा मुख्य भाग आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्य यांच्या संकल्पनेतून वारंवार आमली पदार्थ विरोधात खूप मोठ्या मोहीम राबवण्यात आल्या स्कुल कॉलेज मध्ये नो ड्रुग्स जंगगृती मोहित सुद्धा घेण्यात आले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world