Navi Mumbai International Airport News: मुंबईकरांसाठी एक अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली असून पहिले विमान कधी झेपावणार? याबाबतची माहिती आता समोर आली आहे. 25 डिसेंबर रोजी ख्रिसमसच्या मुहूर्तावर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन पहिले विमान झेपावणार आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, बहुप्रतिक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) येत्या ख्रिसमसच्या शुभ मुहूर्तावर, म्हणजेच २५ डिसेंबरपासून प्रवासी उड्डाणांसाठी खुले होत आहे. अकासा एअरने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, 25 डिसेबर पासून प्रवासी विमाने येथून उड्डाण घेण्यास सुरुवात करतील.
सध्या ट्रॅव्हल एजन्सींकडे या नवीन विमानसेवेबाबत प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात विचारणा सुरू आहे, ज्यानंतर कंपनीने ही माहिती दिली आहे. पहिल्या टप्प्यात, अकासा एअरलाइन नवी दिल्ली, गोवा, कोची आणि अहमदाबाद या प्रमुख शहरांसाठी थेट विमानसेवा पुरवणार आहे सकाळपासून रात्रीपर्यंत विविध वेळेत विमाने उपलब्ध असतील.
काही मार्गांवरील सेवा दररोज, तर काही मार्गांवरील सेवा ठराविक दिवशीच उपलब्ध असणार आहेत. यामुळे प्रवाशांच्या वेळेनुसार आणि गरजेनुसार विमान प्रवासाचे नियोजन करणे सोपे होणार आहे. नवी मुंबई विमानतळाच्या कार्यान्वित होण्यामुळे सध्याच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (CSMIA) ताण मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे.
वाढत्या प्रवासी संख्येमुळे मुंबईतील जुन्या विमानतळाची क्षमता पूर्ण झाली होती, त्यामुळे नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाकडे एक अत्यावश्यक समांतर व्यवस्था म्हणून पाहिले जात आहे. दरम्यान, या विमानतळामुळे केवळ नवी मुंबई आणि पनवेल परिसरातील नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचणार नाही, तर या परिसराच्या आर्थिक विकासालाही मोठी चालना मिळणार आहे.
नक्की वाचा - Pune Navale Bridge Accident : मराठीतील हरहुन्नरी अभिनेता दगावला; वडिलांसाठी नवस करणाऱ्या स्वातीचाही मृत्यू
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world